महत्वाचे अपडेट- शिष्यवृत्ती २०२१ परीक्षेची तारीख पुन्हा बदलली | Scholarship exam date 2021 Maharashtra

महत्वाचे अपडेट- शिष्यवृत्ती २०२१ परीक्षेची तारीख पुन्हा बदलली | Scholarship exam date 2021 Maharashtra

सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) PUP व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) PSS संदर्भात राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुर परिस्थिती लक्षात घेता आता शिष्यवृत्ती परीक्षा १२ ऑगस्ट रोजी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. ०९/०८/२०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.

तद्नंतर राज्यातील काही जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरपरिस्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलन झाल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणींबाबत राज्यातील अनेक संघटनांकडून प्राप्त निवेदनांचा विचार करता सदर परीक्षा दि. ०९/०८/२०२१ ऐवजी १२/०८/२०२१ रोजी घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. १२/०८/२०२१ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल. असे प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 5 वी / Pre Upper Primary Scholarship Examination Std 5th (PUP) - 2021, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. 8 वी / Pre Secondary Scholarship Examination Std 8th (PSS) - 2021

प्रसिद्धी पत्रक वाचण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वेबसाईटला भेट द्या. https://www.mscepuppss.in/



जिल्हा, तालुका , केंद्र , शाळा निहाय SCERT स्वाध्याय रिपोर्ट कसा चेक करायचा ?


 
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा