महत्वाची अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 'या' विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळेचा पर्याय मिळणार

RTE  Admission 2023 24 : शैक्षणिक वर्ष 2024 25 वर्षातील आरटीई 25 टक्के प्रवेश घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किमी परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा नसेल तर अशा विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध असणार आहे, मात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे.

$ads={1}

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 'या' विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळेचा पर्याय मिळणार

RTE  Admission 2023 24

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील 75 हजार 856 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, सद्यस्थितील RTE पोर्टल वरील आकडेवारीनुसार RTE च्या 9 लाख 71 हजार 203 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे. यामध्ये राज्यातील सर्वाधिक नोंदणी ही खालील जिल्ह्यातील शाळांची झाली आहे.

  1. पुणे - 5105
  2. अहमदनगर - 4054
  3. नाशिक - 4014
  4. सोलापूर - 3385
  5. सातारा - 3023

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये  २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा शासनाने काढलेल्या अधिसूचना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ नुसार नियमात बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्ष 2024 25 वर्षातील प्रवेशासाठी आता खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात, जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास, त्या शाळेत  RTE 25% प्रवेश मिळणार नाही. असा बदल करण्यात आला आहे.

मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किमी परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा नसेल तर अशा विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

राज्यातील शाळांची 100 टक्के नोंदणी संपल्यानंतर दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या नवीन अधिसूचनेत केलेल्या नियमानुसार, या शाळांचे मॅपिंग करण्यात येईल आणि त्यानंतर राज्यातील शाळांची जिल्हानिहाय संख्या आणि आरटीई 25 टक्के (RTE Vacancy) रिक्त जागा निश्चित करण्यात येणार आहे, त्यानंतर प्रत्यक्ष पालकांना RTE प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासाठी अजून काही काळ पालकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आरटीई अंतर्गत प्रवेशाची नियमावली जाहीर

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे

RTE 25% Admission Portal Link - Click Here

आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु?

$ads={2}

मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार; डाउनलोड ऑनलाइन फॉर्म..

Previous Post Next Post