Bal Sangopan Yojana 2024 : राज्यामध्ये बालकांच्या संगोपनासाठी बाल संगोपन ही सरकारी योजना राबविली जाते, यामध्ये वय वर्ष 0 ते 18 वर्षातील बालकांचा समावेश होतो, ही योजना आता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना म्हणून ओळखण्यात येते, या योजनेमध्ये दरमहा कुटुंबाला 2 हजार 150 रुपये इतके अनुदान बालकांच्या संगोपनासाठी देण्यात येते, नुकताच या योजनेचा निधी वर्ग करण्यात आला आहे. या योजनेची सविस्तर माहिती पाहूया..
$ads={1}
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना 2024
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ सुधारित अधिनियम २०२१ कलम २ (१४) व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम, २०१८ नुसार अनाथ, निराश्रित, निराधार, बेघर, संरक्षण व निवा-याची गरज असलेल्या ० ते १८ वयोगटातील मुलां- मुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटूंब उपलब्ध करुन देणे व संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या मुख्य उद्देशाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राज्यात सन १९७५ मध्ये सुरु करण्यात आली आहे.
बालसंगोपन योजनेमध्ये 'या' बालकांना समावेश
ज्या मुलांचे वय वर्ष 0 ते 18 वर्ष आहे, त्या वयोगटातील पुढील बालकांना या योजनेचा लाभ मिळतो.
- अनाथ बालके
- ज्या मुलांच्या पालकांचा शोध लागत नाही अशी बालके
- असे बालक जे दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके
- कोविड कालावधीमध्ये दोन अथवा एक पालक गमावलेले बालके
- एक पालक असलेली व family Crisis मध्ये असलेली बालके
- मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग (Abandonment), अविवाहीत मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इ. कारणांमुळे विघटीत झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके
- कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके
- एच.आय.व्ही. (HIV) ग्रस्त/बाधित बालके
- तीव्र मतिमंद बालके
- बहुविकलांग (Multiple disability) बालके
- ज्यांची दोन्ही पालक (आई/वडील) दिव्यांग (अपंग) आहेत अशी बालके
- पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अती हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील (Crisis situation मधील) बालके
- शाळेत न जाणारे बाल कामगार (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले)
बालसंगोपन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढील कागदपत्रे बालसंगोपन अर्जाच्या फाईल सोबत साक्षांकित करून जोडावी. अर्ज नमुना पुढे दिला आहे.
- पालकांचे आधार कार्ड
- बालकांचे आधार कार्ड / जन्मदाखला / बोनाफाईड
- रहिवाशी पुरावा
- आई/वडील मृत असल्यास मृत्यू चे प्रमाणपत्र
- उत्पनाचा दाखला
- कुटुंबाचा एकत्रित फोटो
- बालक दिव्यांग (मतीमंद,बहुविकलांग) असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र
- दिव्यांग बालकाचा पूर्ण फोटो
- पालकांचे बँक किंवा पोस्टाचे पासबुक झेरॉक्स
- निकषानुसार इतर कागदपत्रे उदा. आजर पण असेल तर वैद्यकीय प्रमाणपत्र, HIV प्रमाणपत्र इ.
मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार
या योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षापासून बालकांच्या संगोपनासाठी पालकास प्राप्त होणाऱ्या परिपोषण अनुदानात ₹११००/- वरून ₹२२५०/- वाढ करण्यात येवून व संस्थेस देण्यात येणारे प्रतिबालक प्रतिमहा अनुदानात ₹१२५/- वरून ₹२५०/- इतकी वाढ करण्यात येवून बाल संगोपन योजनेअंतर्गत परिपोषण अनुदानात एकुण १२५००/- इतकी वाढ दि.१७.०२.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आली आहे.
सन २०२३-२४ या वित्तीय वर्षाकरिता स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा स्तरावरून बाल संगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना निधी उपलब्ध करून देण्याकरिता आयुक्त, महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वितरीत करण्यास दि २८ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात देण्यात आली आहे.
बालसंगोपन योजना अर्ज नमुना (Form ) PDF Marathi
{getButton} $text={Download} $icon={download}
बालसंगोपन योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?
बालसंगोपन योजनेचा अर्ज (Form) तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (ICDS) या कार्यालयात जमा करावा. त्यानंतर बाल सरंक्षण समिती तुमचा अर्ज पडताळणी झाल्यांनतर अंतिम मंजुरी देईल त्यांनतर तुमच्या बँकेत दरमहा परिपोषण अनुदान होईल.
संपर्क - जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (ICDS)
मोठी अपडेट! आरटीई ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना
$ads={2}
आरटीई अंतर्गत प्रवेशाची नियमावली जाहीर