मोठी अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना जारी, आवश्यक कागदपत्रे, वयोमर्यादा, इतर महत्वाच्या सूचना सविस्तर वाचा..

RTE Admission Online Application Instructions : शिक्षण हक्क कायद्यानुसार (Right to education) सन २०२४ २५ या शैक्षणिक वर्षातील आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून, आता  (RTE Admission Online Application) करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आल्या आहेत, RTE  साठी अर्ज करण्याऱ्या प्रत्येक पालकांनी सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

$ads={1}

आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे

RTE Admission Online Application Instructions

Maharashtra RTE 25% Admission : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे.

  1. निवासी पुराव्याकरिता : रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक इ. यापैकी कोणताही एक पुरावा असणे आवश्यक आहे.
  2. जन्मतारखेचा पुरावा
  3. जात प्रमाणपत्र पुरावा. (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करुन दिलेले जात प्रमाणपत्र असावे.) 
  4. उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु. १लाखापेक्षा कमी उत्पन्न.) प्रवेश प्रक्रीया सुरु होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा, उदा. सन २०२४-२५ मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन २०२२-२३ किंवा २०२३-२४ या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरीता ग्राहय समजण्यात येईल.
  5. दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
  6. भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता : भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.

भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता आवश्यक कागदपत्रे

  • भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा. 
  • भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा. 
  • जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. 
  • ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक / पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येवून सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आरटीईमधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल.

आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता वयोमर्यादा

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतूदींनुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय ६+ गृहित धरताना मानीव दिनांक ३१ डिसेंबर निश्चित करणेत आलेला आहे.

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी पालकांचे आवश्यक कागदपत्रे

पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना Single Parent (विधवा, घटस्फोटित, आई अथवा वडील या पैकी कोणताही एक) पर्याय निवडला असेल तर संबंधित बालकाचे पालकत्व स्विकारलेल्या व्यक्तीचे प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र ग्राह्य धरण्यात येतील.

आरटीई नियमानुसार एखादया शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात दोन शाळा असल्यास

आरटीई नियमानुसार एखादया शिक्षण संस्थेच्या एकाच आवारात अथवा परिसरात इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत मान्यता असलेली एक शाळा असेल व तेथेच इयत्ता ५ ते १० वी पर्यंत मान्यता असलेली दुसरी शाळा असल्यास इलेमेंटरी सायकल नुसार इयत्ता १ ली ला २५ टक्के प्रवेशप्रक्रीयेअंतर्गत दिलेले प्रवेश पुढे त्याच संस्थेच्या त्याच परिसरातील (एकाच आवारातील) असलेल्या शाळेत इयत्ता ५ वी ते ८ वी करिता ते प्रवेश नियमित राहतील.

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हे अवश्य वाचा 

  1. ज्या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  2. प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरुन पुन्हा प्रवेश घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा अनेक अर्ज भरु नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी.

आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारण्याचे कारणे

शाळा खालील कारणांमुळे आरटीई २५ टक्के प्रवेश नाकारु शकेल याची स्पष्ट कल्पना पालकांना देण्यात यावी व याबाबतची माहिती पोर्टलवर उपलब्ध असावी.

  • अवैध निवासाचा पत्ता
  • अवैध जन्मतारखेचा दाखला
  • अवैध जातीचे प्रमाणपत्र
  • अवैध उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अवैध फोटो आयडी
  • अवैध दिव्यांग प्रमाणपत्र

वरील कागदपत्रे हे अवैध असल्यास शाळा प्रवेश नाकारू शकतील, यासाठी पालकांनी वैध वर नमूद केल्याप्रमाणे योग्य कागदपत्रे ऑनलाईन अर्ज भरताना नमूद करावेत, जेणेकरून कागदपत्रे पडताळणी समितीकडे ते वैध ठरू शकतील.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात  RTE Portal वरील सूचनांचे अवलोकन करावे

आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते, त्यावेळी पालकांनी केवळ SMS वर अवलंबून न राहता RTE Portal वर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे व सदरील माहितीचा लाभ घ्यावा. सदर प्रतिक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चित होईलच असा नाही.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसंदर्भात इतर महत्वाच्या सूचना येथे पहा

आरटीई २५ टक्के प्रवेश या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज भरता येणार

Previous Post Next Post