महत्वाची अपडेट! पोलीस उपनिरीक्षक पदासाठी या उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित

PSI Height And Weight Male In Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक मुख्य स्पर्धा परीक्षेतील शारीरिक चाचणीकरिता उमेदवारांसाठी शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित करण्यात आली आहेत.

$ads={1}

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी या उमेदवारांकरिता शारीरिक चाचणीची मानके व गुण निश्चित

Psi Height And Weight Male In Maharashtra

'स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता' आणि 'स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता' शारीरिक चाचणीची मानके व गुण आयोगामार्फत खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

शारीरिक चाचणीचा तपशील

स्वतःची लिंग ओळख पुरुष अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता

  1. गोळा फेक- वजन- ७.२६० कि.ग्रॅ. कमाल गुण-१५
  2. पुलअप्स- कमाल गुण-२०
  3. लांब उडी- कमाल गुण-१५
  4. धावणे (८०० मीटर)- कमाल गुण-५०

स्वतःची लिंग ओळख महिला/तृतीयपंथी अशी केलेल्या तृतीयपंथी उमेदवारांकरिता

  1. गोळा फेक- वजन- ४ कि.ग्रॅ.- कमाल गुण-२०
  2. धावणे (४०० मीटर) - कमाल गुण-५०
  3. लांब उडी- कमाल गुण-३०
मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन महत्वाचे अपडेट जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर

सन-२०२२ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ६० टक्के गुण (म्हणजे ६० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

सन-२०२३ च्या परीक्षेकरिताः शारीरिक चाचणीचे गुण अर्हताकारी करण्यात आले असून, शारीरिक चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७० टक्के गुण (म्हणजे ७० गुण) मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक राहतील. तसेच या गुणांचा अंतिम गुणवत्तेकरिता/अंतिम निवडीकरिता विचार होणार नाही.

तृतीयपंथी उमेदवारास त्यांची पुरुष, महिला किंवा तृतीयपंथी अशी स्वतःची लिंग ओळख निश्चित करणे आवश्यक राहील व यासंदर्भात विहित सक्षम प्राधिका-याने दिलेले विहित नमुन्यातील प्रमाणपत्र शारीरिक चाचणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील. सदर माहिती आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

जिल्हा सत्र न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता फक्त 4 थी पास, 47,600 एवढा पगार मिळणार

मोठी अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे येथे पहा

$ads={2}

राज्यात तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु

सुवर्णसंधी! या विभागात 468 जागांसाठी नवीन मोठी भरती

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Psi Height And Weight Male In Maharashtra


Previous Post Next Post