District Court Recruitment 2024 : जिल्हा सत्र न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! पात्रता फक्त 4 थी पास, 47,600 एवढा पगार मिळणार

District Court Recruitment 2024 : जिल्हा न्यायालयाअंतर्गत सरळसेवा भरती जाहिरात निघाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून निवड यादी तयार करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

$ads={1}

जिल्हा सत्र न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी!

District Court Recruitment 2024

जिल्हा न्यायालय, अहमदनगर आस्थापनेवरील "सफाईगार (Sweeper)" या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदाचे नाव : सफाईगार

वेतनश्रेणी : सातव्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर एस-१ रु.१५०००-४७६००-/ अधिक नियमानुसार देय भत्ते.

शैक्षणिक अर्हता: अर्जदार हा इयत्ता ४ थी उत्तीर्ण असावा. Good physique and ability to carry out the duties attached to the post. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा: जाहिरात प्रसिध्दीच्या दिवशी शासनाने निर्दिष्ट केल्यानुसार, सर्वसाधारण प्रवर्गाच्या बाबतीत वय १८ वर्षापेक्षा कमी आणि ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग किंवा विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

योग्य मार्गाने अर्ज करणा-या राज्य/ केंद्र सरकारी कर्मचा-याच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा लागू असणार नाही.

उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाकद्वारे (आर.पी.ए.डी) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट) द्वारे खालील पत्यावर दिनांक २४/०४/२०२४ रोजी सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत अथवा त्यापूर्वी पोहोचतील असे पाठवावेत. या तारखेनंतर आलेले अर्ज कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पर्मनंट नोकरीची सुवर्णसंधी! विभागात तब्बल 1377 जागांसाठी भरती सुरु

उमेदवारांना अर्ज करण्यासंदर्भात सुचना

  • अर्ज करण्याची पध्दत जाहिरात, अर्ज व प्रमाणपत्र जिल्हा न्यायालय, अहमदनगर संकेतस्थळ https://ahmednagar.dcourts.gov.in यावर उपलब्ध आहेत. त्या नमुण्यातच अर्ज व सोबतची प्रमाणपत्रे व कागदपत्रांच्या स्वप्रमाणित प्रती सादर करावीत.
  • शासकीय कर्मचा-याने अर्ज कसा करावा जे उमेदवार शासकीय सेवेत आहेत त्यांनी त्या-त्या विभाग/कार्यालय प्रमुखांची लेखी परवानगी घेवूनच अर्ज करावा.
  • उमेदवाराने त्याचे/तिचे अलीकडेचे पासपोर्ट आकाराचे रंगीत छायाचित्र (फोटो) अर्जावर दिलेल्या जागी लावुन त्यावर स्वाक्षरी करावी.
  • दोन सम्माननीय व्यक्तीनी जाहिरातीच्या तारखेनंतर दिलेले चारित्र्याचे दाखले सादर करावेत.
  • अर्जासोबत नमुना-अ मधील प्रतिज्ञापत्र जोडावे,
  • विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरविणेत येईल.
राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

जिल्हा व सत्र न्यायालय भरती जाहिरात व अर्जाचा नमुना PDF डाउनलोड करा

अधिकृत वेबसाईट : https://ahmednagar.dcourts.gov.in/

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

$ads={2}

Previous Post Next Post