Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Mahavitaran) मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक पदाच्या तब्बल 468 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे, विशेष म्हणजे या पदाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर सेवेत सामावून घेण्यात येते.
$ads={1}
महावितरण विभागात 468 जागांसाठी नवीन मोठी भरती सुरु
- एकूण रिक्त जागा : 468
- पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts)
- आवश्यक शैक्षणिक पात्रता : B.Com/BMS/BBA With MSCIT or its Equivalent.
- वयोमर्यादा : दिनांक 29 डिसेंबर 2023 रोजी पर्यंत 30 वर्ष [इतर उमेदवारांना 5 वर्षे सूट]
सदर कालावधीत देण्यात येणार मानधन
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल.
- अ) प्रथम वर्ष - एकूण मानधन रुपये १९,०००/-
- ब) द्वितीय वर्ष - एकूण मानधन रुपये २०,०००/०
- क) तृतीय वर्ष - एकूण मानधन रुपये २१,०००/- उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल, भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येते.
कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर या पदावर समायोजन होणार
महावितरण अंतर्गत वेतनगट-४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात आले आहेत. या पदाचा ३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना 'Lower Division Clerk (Accounts) वा नियमित पदावर सामावून घेण्यात येणार आहे.
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमीत पदावर रु. Rs. 29035-710-32585-955-42135-1060-72875 या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.
शिक्षक भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध
या विभागात 5347 जागांसाठी मेगा भरती सुरु
महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 एप्रिल 2024