RTE Admission 2024 : राज्यातील आरटीई 25 टक्के प्रक्रिया सुरू झाली असून, राज्यातील 61 हजार 397 शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे, सन 2024 25 या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आता प्राथमिक शिक्षण संचानलयाकडून दिनांक 18 मार्च 2024 रोजी नवीन परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
$ads={1}
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2024 | RTE Admission 2024
आरटीई 25 टक्के अंतर्गत नविन प्रवेशित मुलांसाठी राज्यातील खाजगी शाळेत 25 टक्के जागा या राखीव असतात. दरवर्षी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत लॉटरी पद्धतीने 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबवली जाते.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. अधिसूचना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ नुसार सुधारित नियम नमूद केलेले आहेत.
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल
पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेशासाठी दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचना (RTE Gazette 2024) नुसार आता नियमात काही बदल करण्यात आले आहे.
महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क (वंचित व दुर्बल गटातील बालकांचे इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर कमीत कमी २५ टक्के प्रवेश करण्याची पद्धत) नियम, २०१३ नुसार वंचित व दुर्बल घटकातील २५ टक्के प्रवेशाकरीता ज्या खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात शासकीय शाळा व अनुदानित शाळा आहेत अशी शाळा स्थानिक प्राधिकरणाकडून निवडण्यात येणार नाही.म्हणजेच याचा अर्थ असा आहे की, खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात, जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या शाळेत आता RTE 25% प्रवेश मिळणार नाही.
आरटीई शाळांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी मुदतवाढ
राज्यातील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक ६ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधीमध्ये करण्याबाबत संचालनालयाने ६ मार्च २०२४ रोजीच्या पत्रान्वये निर्देश देण्यात आलेले होते.
मात्र काही जिल्हयांचे पुर्ण शाळांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे आता दिनांक २२ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेअंतर्गत पात्र असलेल्या शाळांचे १०० टक्के रजिस्ट्रेशन विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबत कळविण्यात आले आहे. यापूढे कसल्याही परिस्थीतीत मुदतवाढ दिली जाणार नाही असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जराज्यातील 61 हजार 397 शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण
आरटीई पोर्टल (RTE Portal) वरील आकडेवारीनुसार दिनांक २० मार्च २०२४ रोजीपर्यंत राज्यातील 61 हजार 397 शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असून, अजून शाळांची नोदणी प्रक्रिया सुरु आहे. साधारपणे दिनांक २२ मार्च २०२४ पर्यंत राज्यातील शाळांची नोंदणी व आरटीईच्या रिक्त जागांची आकडेवारी स्पष्ट होणार आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती
आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज पालकांना 'या' तारखेनंतर भरता येणार | RTE Admission 2024-25 Maharashtra Start Date
RTE Admission 2024-25 प्रक्रिया साधारणपणे वेगवेगळ्या टप्यामध्ये पार पडत असते, त्यामध्ये पहिल्या टप्यात वरील व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे
- आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी
- विद्यार्थी नोंदणी | RTE New Registration
- ऑनलाईन अर्ज | RTE Online Application
- विद्यार्थी माहिती भरणे | Child Information
- ऑनलाईन अर्ज भरणे |RTE Online Application
- आरटीई शाळा निवड | School Selection
- भरलेल्या अर्जाची स्थिती | Summary - Application Details
- लॉटरी पद्धतीने निवड
- प्रवेशपत्र |Admit Card
- कागदपत्रे तपासणी
- RTE प्रवेश निश्चित
पहिल्या टप्यातील शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सध्या दिलेल्या नियोजित तारखेनुसार दिनांक २२ मार्च पर्यंत शाळांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी म्हणजेच पालकांना RTE साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
'आरटीई' प्रवेशासाठी शाळांना या तारखेपर्यंत अंतिम मुदतमोठी बातमी! नवीन शैक्षणिक वर्षांपासून आता सर्व शाळांमध्ये 'हा' उपक्रम