RTE School Registration : राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 75 हजार 264 शाळांची नोंदणी; जिल्हानिहाय आकडेवारी पहा

RTE School Registration : राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया शाळा नोंदणी सुरु असून, दिनांक 26 मार्च 2024 पर्यंत राज्यभरातील जवळपास 75 हजार 264 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील  5 हजार 02 शाळा नोंदणी झाली असून, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील 4 हजार 53 शाळा तर नाशिक जिल्ह्यातील 4 हजार 14 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे.

$ads={1}

राज्यातील 'आरटीई' प्रवेशासाठी 75 हजार 264 शाळांची नोंदणी

RTE School Registration

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये  २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा शासनाने काढलेल्या अधिसूचना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ नुसार नियमात बदल करण्यात आले आहेत.

त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्ष 2024 25 वर्षातील प्रवेशासाठी आता खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात, जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास, त्या शाळेत  RTE 25% प्रवेश मिळणार नाही. असा बदल करण्यात आला आहे.

या बदलल्या नियमामुळे यंदा राज्यातील सर्व शाळांची नोंदणी नव्याने करण्यात येत आहे, त्यामुळे राज्यस्तरावरून सर्व शाळांची नोंदणी करण्यासाठी दिनांक २७ मार्च २०२४ पर्यंत वाढीव मुदत देण्यात आली आहे.

आतापर्यंत राज्यातील जवळपास  75 हजार 264 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, या शाळेत 9 लाख 64 हजार 394 प्रवेश क्षमता असल्याचे सध्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे. 

मात्र शाळांची 100 टक्के नोंदणी संपल्यानंतर दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या नवीन अधिसूचनेत केलेल्या नियमानुसार, या शाळांचे मॅपिंग करण्यात येईल आणि त्यानंतर राज्यातील शाळांची जिल्हानिहाय संख्या आणि आरटीई 25 टक्के (RTE Vacancy) रिक्त जागा निश्चित करण्यात येणार आहे, त्यानंतर प्रत्यक्ष पालकांना RTE प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

मोठी बातमी! आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

राज्यातील 75 हजार 264 शाळांची नोंदणी पूर्ण; जिल्हानिहाय आकडेवारी

राज्यातील आरटीई 25 टक्के शाळा नोंदणी दिनांक 25 मार्च 2024 पर्यंत राज्यभरातील जवळपास 75 हजार 264 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 5 हजार 02 शाळा नोंदणी झाली असून, त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील 4 हजार 53 शाळा तर नाशिक जिल्ह्यातील 4 हजार 14 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे पहा.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज

RTE School Registration

मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार; डाउनलोड ऑनलाइन फॉर्म..

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका लेटेस्ट न्यूज

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा