मोठी बातमी! आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

RTE Admission Education Department Issued Guidelines : बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (Right to education) नुसार सन २०२४ २५ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

$ads={1}

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

RTE Admission Education Department Issued Guidelines

दरवर्षी प्रमाणे शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ करिता आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येत असून, शालेय शिक्षण विभाग अधिसूचना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ मधील सुधारित निकषानुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत पुढील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत.

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी सर्व प्रकारच्या शाळांचा समावेश राहणार

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील सुधारित अधिसूचना दिनांक ९.०२.२०२४ नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई २५ टक्के प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असणार आहे. 

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित

वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना आरटीई २५ टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पालकांना आवडीनुसार शाळा निवडता येणार 

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी एखादया पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची/शासकीय शाळांची निवड करावयाची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा / शासकीय शाळा निवडता येईल.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी 'या' विद्यार्थ्यांना खासगी (इंग्रजी) शाळेचा पर्याय मिळणार

ज्या विदयार्थ्यांच्या घरापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा नसतील व १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा (Self-financed School) असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत (इंग्रजी) शाळेत मुलांना २५ टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी 'या' विद्यार्थ्यांना ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांचा पर्याय मिळणार

अपवादात्मक परिस्थितीत विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून १ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा नसेल तर विदयार्थ्यांच्या निवासस्थानापासून ३ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावरील शाळांमध्ये वर नमूद केलेल्या प्राधान्य क्रमानुसार प्रवेश मिळणार आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज भरता येणार

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी शाळा निश्चित

वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेशअंतर्गत प्रवेशासाठी खालील व्यवस्थापनाच्या शाळा निश्चित करण्यात आल्या आहेत.

School fixed for RTE 25 percent admission

टिपः- आरटीई कायदयानुसार २५ टक्के प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेले आहे.

आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पात्र शाळा नोंदणी केल्यानंतर व आरटीई २५ टक्के अंतर्गत विद्यार्थी प्रवेशित झाल्यानंतर कालांतराने जर सदर शाळेस सक्षम प्राधिकारी यांचेकडुन अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झाल्यास आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून इयत्ता ८ वी पर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या आरटीई अंतर्गत पात्र वर्गापर्यंत आरटीई २५ टक्के मधून शिक्षण देणे अनिवार्य असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्यापुढील वर्षाकरीता सदर शाळा आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पात्र ठरणार नाही. (मार्गदर्शक सूचना)

आरटीई २५ टक्के प्रवेश या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज भरता येणार

मोठी अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना

$ads={2}

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका लेटेस्ट न्यूज

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार; डाउनलोड ऑनलाइन फॉर्म..

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा