RTE Admission Registration 2024-25 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश राखीव ठेवण्याची तरतूद आहे, आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश संदर्भात प्राथमिक शिक्षण संचनालय कार्यालयाकडून आता एक महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे.
$ads={1}
आरटीई प्रवेशासंदर्भात या शाळांना सक्त सूचना जारी
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९, सुधारित अधिसूचना दिनांक ०९.०२.२०२४ अधिसूचनेचा चुकीचा अर्थ लावून राज्यातील स्वयंअर्थसहाय्यीत शाळा वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग घटकातील मुलांना २५ टक्के प्रवेश राखीव ठेवणार नाही तसेच आरटीई २५ टक्के पोर्टलवर शाळा नोदंणी करणार नाही अशी भूमिका घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यानुषंगाने आता आरटीई २५ टक्के पोर्टलवर पात्र असणाऱ्या ज्या शाळांनी अद्यापपर्यंत आरटीई पोर्टलवर २५ टक्के प्रवेशासाठी शाळा नोंदणी केलेली नाही, अशा शाळांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. तसेच शासन निर्णय दिनांक १६ जानेवारी २०१८ मधील तरतूदीनुसार शाळा मान्यता काढण्याची कार्यवाही तात्काळ करण्याबाबत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
आरटीई प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित
दिनांक २५ जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे.
शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे, कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२४ अखेर खालील प्रमाणे राहील.
सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय
आरटीई अंतर्गत प्रवेशाची नियमावली जाहीर
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी राज्यातील 75 हजार 957 शाळांची नोंदणी पूर्ण
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील 75 हजार 957 शाळांची नोंदणी पूर्ण झाली असून, सद्यस्थितील RTE पोर्टल वरील आकडेवारीनुसार RTE च्या 9 लाख 72 हजार 560 विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात 'हा' बदल
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ नुसार राज्यातील खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. यंदा शासनाने काढलेल्या अधिसूचना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ नुसार नियमात बदल करण्यात आले आहेत.
त्यानुसार पुढील शैक्षणिक वर्ष 2024 25 वर्षातील प्रवेशासाठी आता खाजगी विना अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात, जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास, त्या शाळेत RTE 25% प्रवेश मिळणार नाही. असा बदल करण्यात आला आहे.
मात्र ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किमी परिसरात जर शासकीय किंवा अनुदानित शाळा नसेल तर अशा विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांचा पर्याय उपलब्ध असणार आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी या तारखेनंतर ऑनलाईन अर्ज भरता येणार
राज्यातील शाळांची 100 टक्के नोंदणी संपल्यानंतर दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या नवीन अधिसूचनेत केलेल्या नियमानुसार, या शाळांचे मॅपिंग करण्यात येईल आणि त्यानंतर राज्यातील शाळांची जिल्हानिहाय संख्या आणि आरटीई 25 टक्के (RTE Vacancy) रिक्त जागा निश्चित करण्यात येणार आहे, त्यानंतर प्रत्यक्ष पालकांना RTE प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पोर्टल वरील वेळापत्रकानुसार शाळांच्या नोंदणीसाठी 12 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आली आहे, आता लवकरच पालकांना आपल्या पाल्यांची नोंदणी करता येणार आहे.
मोठी अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचनाआरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे
मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार; डाउनलोड ऑनलाइन फॉर्म..
RTE 25% Admission Portal Link - Click Here
$ads={2}
मोठी अपडेट! आरटीई ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना