Employees Promotion : राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन निर्णय जारी

Employees Promotion : गट 'क' आणि गट 'ड' पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी पदोन्नती समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे, याबाबतचा शासन निर्णय दिनांक ३ एप्रिल २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन निर्णय जारी

employees promotion

सामान्य प्रशासन विभागाच्या दि १ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नती समिती गठीत करण्याबाबत कार्यपध्दती विशद करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयान्वये कार्यालय प्रमुख हे अध्यक्ष असावेत अशी तरतूद करण्यात आलेली आहे. मुंबईचे शेरीफ कार्यालयाचे 'नगरपाल' हे कार्यालय प्रमुख असतात. सद्यःस्थितीत नगरपाल पद रिक्त असल्याने सदर पदोन्नती समितीची आता पुनर्रचना करण्यात आली आहे.

मुंबईचे शेरिफ (नगरपाल) कार्यालयातील गट-क व गट-ड च्या कर्मचा-यांना पदोन्नती देण्यासाठी आता पुढीलप्रमाणे पदोन्नती समिती गठीत करण्यात आली आहे.

कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी असलेल्या सर्व प्रकारणांचा प्रत्येक पदाच्या सेवाप्रवेश नियमानुसार त्याचप्रमाणे मागासवर्गीयांसंबंधी शासनाने वेळोवेळी काढलेल्या आदेशानुसार समान सूचीतील जेष्ठता व पात्रता लक्षात घेऊन प्रत्येक पदोन्नतीच्या पदासाठी निवडसूची तयार करणे, सदर समिती करणार आहे.

राज्यातील 'या' पदांचे समायोजन करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय जारी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

पदोन्नती समिती

  • मा. नगरपाल/सह सचिव (कार्यासन ९) विधि व न्याय विभाग (शेरिफ पद रिक्त असल्यास) - अध्यक्ष
  • उप नगरपाल - सदस्य
  • उप सचिव/अवर सचिव (कार्यासन ९) - सदस्य
  • कक्ष अधिकारी (उप नगरपाल कार्यालय) / कक्ष अधिकारी (कार्यासन ९) - सदस्य सचिव

सदर समितीमधील सदस्यांमधून मागासवर्गीय प्रतिनिधी उपलब्ध झाला नाही तर समितीचे अध्यक्ष, मागासवर्गीय प्रतिनिधी सदस्य नेमतील असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय)

मुलांच्या संगोपनासाठी दरमहा 2250 रूपये मिळणार; डाउनलोड ऑनलाइन फॉर्म

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा