Adjustment Of Posts In Directorate Arts : कला संचालनालयाच्या आस्थापनेवरील पदांचे समायोजन हे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये करण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय तसेच महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे परीक्षा नियंत्रक या पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
राज्यातील 'या' पदांचे समायोजन करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय जारी
कला संचालनालयाच्या अधिपत्याखाली ३१ अशासकीय अनुदानित कला संस्था व १७८ अशासकीय विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित कला संस्था कार्यरत आहेत.
सदर संस्थांचे सनियंत्रण प्रभावीरित्या करता यावे म्हणून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ अधिनियम, १९९७ च्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम तयार करण्यासाठी सन २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. सदर समितीने सादर केलेल्या अधिनियमाचे प्रारुप दि १९ मे २०२३ मध्ये शासनास सादर केला आहे.
त्यानंतर सदर प्रारुपास विधी व न्याय विभागाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर अधिनियमाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या समोर ठेवण्यात आला होता. त्यानुसार दि १४ डिसेंबर २०२३ च्या मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियमास मा. मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे.
तसेच, कला संचालनालयाच्या आस्थापनेवरील २६ पदे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये समायोजित करण्यास, सदर मंडळाकरिता ३७ नवीन पदे निर्माण करण्यास व नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या ३७ पदांच्या वेतनासाठी आवश्यक असणाऱ्या अंदाजित वार्षिक एकूण रु.२,२३,२३,५६४/- (रुपये दोन कोटी तेवीस लाख तेवीस हजार पाचशे चौसष्ट फक्त) इतक्या आवर्ती खर्चास मा. मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
मा. मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर, सदर अधिनियमाचे विधेयक सन २०२३ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्यात आले आहे.
त्यानुषंगाने, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ अधिनियम, २०२३ महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक १९ जानेवारी, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आला आहे. तसेच, दिनांक २३ फेब्रुवारी, २०२४ च्या महाराष्ट्र शासन राजपत्रात सदर अधिनियमाचा नियत दिनांक २३ फेब्रुवारी, २०२४ हा निश्चित करण्यात आला आहे.
संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार कला संचालनालयाच्या आस्थापनेवरील २६ पदे महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळामध्ये समायोजित करण्यास तसेच, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे सचिव, उपसचिव (कला) व परीक्षा नियंत्रक यांची कर्तव्ये व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर केला आहे. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने, आता दिनांक ४ एप्रिल २०२४ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय)
मोठी बातमी! आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी