Employee Group Personal Accident Insurance Scheme : राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित समूह वैयक्तिक अपघात विमा योजना करण्यात आला आहे, यामध्ये गट-अ ते ड मधील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असून, राशीभूत विमा रक्कम रुपये 25 लाखापर्यंत अपघात विमा कवच देण्यात आले आहे, याच धर्तीवर आता महावितरण व म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनीत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधी करीता सदर अपघात योजनेचे नुतनीकरण करण्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
$ads={1}
राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित समूह वैयक्तिक अपघात विमा योजना लागू
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरीता संपुर्णतः कर्मचाऱ्यांच्या वर्गणीवर आधारीत राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात विमा (Personal Accident Insurance Scheme) योजनेमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार दि. १ एप्रिल २०२३ पासून राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजनेची वार्षिक वर्गणी व राशीभूत रक्कम (Capital Sum Insured) यामध्ये गटनिहाय वाढ करण्यात आली असून, सदर वार्षिक वर्गणी व राशीभुत रक्कम खालीलप्रमाणे निर्धारीत करण्यात आली आहे.
सदर योजनेमध्ये कर्मचाऱ्याला अपंगत्व / विकलांगता आल्यास राशीभूत विमा योजनेचा लाभ खालीलप्रमाणे अनुज्ञेय आहे.
- अपघातामुळे आलेला मृत्यू : १०० टक्के
- अपघातामुळे आलेले कायमचे अपंगत्व : १०० टक्के
- अपघातात दोन हात, दोन पाय, दोन्ही डोळे गमावल्यास : १०० टक्के
- अपघातात एक हात, पाय अथवा एक डोळा गमावल्यास : ५० टक्के
राज्यातील 'या' पदांचे समायोजन करण्याबाबत महत्वपूर्ण शासन निर्णय जारी
या कर्मचाऱ्यांच्या अपघात विम्याचे नुतनीकरण करण्यासाठी मंजुरी
त्यानुसार महावितरण व म.रा.वि.मंडळ सुत्रधारी कंपनीत कार्यरत असलेल्या वेतनगट- १ ते ४ मधील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२३ पासून वेतनगटनिहाय राशीभुत विमा रक्कम व वार्षिक वर्गणी निर्धारीत केल्याप्रमाणे 'कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना' लागू करण्यात आली असून त्याची मुदत दि. ३१ मार्च २०२४ रोजी संपुष्टात आली आहे, त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना दि. १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीकरीता नुतनीकरण करण्यासाठी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (महावितरण) यांनी मंजूरी दिली आहे. (परिपत्रक)
महत्वाचे
- विमा धारक सदस्याच्या अपघातापूर्वी, वर्गणी योजनेच्या लेखाशिर्षामध्ये जमा होणे आवश्यक आहे. अन्यथा, विमावर्गणी अभावी विमादावा देय होणार नाही व याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित कार्यालयाची असणार आहे.
- अपघात विमा योजनेखाली योजनेच्या सदस्यास अपघातामुळे मृत्यू / विकलांगता उद्भवल्यास, त्याबाबतची लेखी सूचना विमा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना संबंधित कार्यालयाने त्वरित (1 महिन्याच्या आत) देणे आवश्यक आहे. [शासन निर्णय]