RTE Admission 2024 : आरटीई अंतर्गत प्रवेशाची नियमावली जाहीर, आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे..

RTE Admission 2024 : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE Act) आरटीई बदलानुसार प्रवेशाची नियमावली शालेय शिक्षण विभागाने अंतिम केली आहे, त्यानुसार RTE Admission घेताना सुरवातीला घरापासून एक किमी अंतरावरील खासगी अनुदानित शाळांची निवड करावी लागणार आहे. शासकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि या दोन्ही प्रकारच्या शाळा तेवढ्या अंतरावर नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित शाळेचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे.

$ads={1}

आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित

RTE Admission 2024 25

'आरटीई'अंतर्गत शालेय शिक्षण विभागाने शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. पण, एखाद्या पालकाला अनुदानित शाळेऐवजी त्यांच्या परिसरातील (1 किमी अंतर) जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शाळेत मुलाला प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांना तसाही प्रवेश घेण्याचा पर्याय असणार आहे. 

विद्यार्थ्यांची नोंदणी पुढील आठवड्यापासून सुरु होणार असून, ज्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किमी अंतरावर खासगी अनुदानित किंवा सरकारी शाळा नसेल आणि इंग्रजी माध्यमाची स्वयंअर्थसहाय्यिता शाळा असल्यास त्यांना त्याठिकाणी प्रवेश घेता येणार आहे. पण, तत्पूर्वी शाळांचे मॅपिंग होईल आणि खरोखरच त्या विद्यार्थ्याच्या घरापासून अनुदानित किंवा सरकारी शाळा नसल्याची खात्री केली जाणार आहे.

अपवादात्मक परिस्थितीत अनुदानित, सरकारी व स्वयंअर्थसहाय्यिता (English medium private school) शाळा विद्यार्थ्याच्या 1 किमी अंतरावर नसेल तर त्या विद्यार्थ्यांना 3 किमी अंतरावरील शाळा निवडता येईल, असेही शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 

'आरटीई'च्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतून अल्पसंख्यांक शाळा वगळण्यात आल्या आहेत. पण, एखादी शाळा पुढील काही वर्षात अल्पसंख्यांक झाल्यास आता 'आरटीई'तून त्याठिकाणी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता आठवीपर्यंत मोफत शिक्षण द्यावे लागेल, असेही या नियमावलीतून स्पष्ट करण्यात आले आहे.

आरटीई प्रवेशाची नियमावली जाहीर

महत्वाचे मुद्दे
  • तालुका (गटशिक्षणाधिकारी) स्तरावर प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे पडताळणी समिती असेल, तर  महापालिका स्तरावरही अशीच समिती नेमली जाणार आहे.
  • 'आरटीई' प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकाकडे रेशनकार्ड, वाहन परवाना, वीज-टेलिफोन, प्रॉपर्टी टॅक्सचे बिल, आधार किंवा मतदानकार्ड, राष्ट्रीयीकृत बॅंकेचे पासबूक यापैकी एक पुरावा असावा.
  • भाडेतत्त्वावरील पालकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार असावा. भाडेकरार अर्ज भरण्यापूर्वीचा असावा व तो ११ महिने किंवा त्याहून अधिक काळाचा असावा.
  • उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी) असावा.
  • जातीचा दाखलाही आवश्यक असणार आहे.
  • दिव्यांग मुलासाठी जिल्हा शल्यचिकित्स, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयांचे ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
  • २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय मानीव दिनांक ३१ डिसेंबरपर्यंत सहा वर्षे पूर्ण आवश्यक आहेत. दरम्यान, पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळेत विद्यार्थ्याने आरटीईतून प्रवेश घेतला असल्यास पुढील आठवीपर्यंतचे शिक्षण त्याला त्या परिसरातील शाळेत मोफत घेता येईल.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे

RTE Admission 2024-25 प्रक्रिया साधारणपणे वेगवेगळ्या टप्यामध्ये पार पडत असते, त्यामध्ये पहिल्या टप्यात RTE पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन अंतिम टप्प्यात आले असून, आता पुढील आठवड्यात प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी सुरु होणार आहे. RTE प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे

  1. आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी
  2. विद्यार्थी नोंदणी | RTE New Registration
  3. ऑनलाईन अर्ज | RTE Online Application
  4. विद्यार्थी माहिती भरणे | Child Information
  5. ऑनलाईन अर्ज भरणे  |RTE Online Application
  6. आरटीई शाळा निवड | School Selection
  7. भरलेल्या अर्जाची स्थिती | Summary - Application Details
  8. लॉटरी पद्धतीने निवड
  9. प्रवेशपत्र |Admit Card
  10. कागदपत्रे तपासणी
  11. RTE प्रवेश निश्चित

पहिल्या टप्यातील शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी लवकरच सुरु होणार असून, वरील टप्यानुसार RTE प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

मोठी बातमी! आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी

मोठी अपडेट! आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अत्यंत महत्वाच्या सूचना

$ads={2}

पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन प्रवेशित बालकांची वयोमर्यादा येथे पहा

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे

Previous Post Next Post