RTE Admission Maharashtra Start Date 2024-25 : आरटीई 25 टक्के प्रक्रियेअंतर्गत राज्यातील 75 हजार 961 शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असून, 9 लाख 72 हजार 768 (RTE Vacancy) बालकांना आरटीई अंतर्गत मोफत प्रवेश मिळणार आहे, RTE Portal वरील Admission Schedule नुसार दि 12 एप्रिल 2024 पर्यंत आरटीई नोंदणीसाठी शाळांना शेवटची संधी असणार आहे, तर आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरु होणार? आणि जिल्हानिहाय RTE शाळा आणि जागा सविस्तर पाहूया.
$ads={1}
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल
आरटीई 25 टक्के प्रक्रिया यंदा उशिरा सुरु होण्याचे कारण म्हणजे शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजीच्या अधिसूचनेनुसार (RTE Gazette 2024) नुसार आता RTE नियमात काही बदल करण्यात आले आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वंयअर्थसहाय्यीत शाळा असा प्रवेशासाठीचा प्राधान्यक्रम असणार आहे.
ज्या विदयार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा / स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळा नसतील व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वंयअर्थसहाय्यीत शाळा (Self-financed School) असेल तर अशा परिस्थितीत त्या स्वंयअर्थसहाय्यीत (इंग्रजी) शाळेत मुलांना 25 टक्के प्रवेशांतर्गत प्रवेश मिळणार आहे.
आरटीई प्रवेश शाळा नोंदणीसाठी शेवटची संधी!
यंदा आरटीई प्रवेश प्रक्रिया मार्च महिन्यात सुरु झाली असून, दिनांक 4 मार्च 2024 पासून राज्यातील शाळांची नोंदणी सुरु आहे, आता जवळपास शाळा नोंदणी अंतिम टप्प्यात आली असून, RTE Portal वरील Admission Schedule नुसार दि 12 एप्रिल 2024 पर्यंत आरटीई नोंदणीसाठी शाळांना शेवटची संधी असणार आहे.
मोठी बातमी! अखेर आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु'आरटीई' प्रवेशासाठी 75 हजार 961 शाळांची नोंदणी पूर्ण
राज्यातील जवळपास 75 हजार 961 शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असून, या शाळेत 9 लाख 72 हजार 768 (RTE Vacancy) प्रवेश क्षमता असल्याचे सध्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 5 हजार 51 शाळा नोंदणी झाली असून, अहमदनगर जिल्ह्यातील 4 हजार 54 शाळा तर नाशिक जिल्ह्यातील 4 हजार 14 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हानिहाय RTE शाळा आणि जागा आकडेवारी खालीलप्रमाणे पहा.
आरटीई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज कधी सुरु होणार?
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी आता विद्यार्थी नोंदणी साठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, दिनांक 12/04/2024 पर्यंत शाळा नोंदणीची शेवटची तारीख आहे, यानंतर लगेचच म्हणजे (RTE Admission Maharashtra Start Date 2024-25) पुढील आठवड्यात प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. सविस्तर मार्गदर्शक सूचना येथे पहा.
पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन प्रवेशित बालकांची वयोमर्यादा येथे पहामोठी बातमी! आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी शिक्षण विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी