RTE Admission Online Application Started : अखेर राज्यातील आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु करण्याबाबत प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण संचालनायाकडून कळविण्यात आले आहे.
$ads={1}
मोठी बातमी! अखेर आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकाकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश कधी सुरु होणार? याबाबत बऱ्याच दिवसापासून पालक सातत्याने विचारणा करत होते, अखेर दिनांक १५ एप्रिल रोजीच्या परिपत्रकान्वये पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीताची प्रक्रिया सुरु करणेबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयाने जाहीर केले आहे.
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास या तारखेपर्यंत मुदत
दरवर्षी प्रमाणे यंदा सुधारित अधिसूचना दिनांक ०९/०२/२०२४ नुसार सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येत असून, सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियअंतर्गत दिनांक १६/०४/२०२४ ते ३०/०४/२०२४ या कालावधीमध्ये पालकांना प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे
Maharashtra RTE 25% Admission : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता खालील कागदपत्रे आवश्यक असणार आहे.
- निवासी पुराव्याकरिता : रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज/टेलिफोन देयक, प्रॉपर्टी टॅक्स देयक/घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक इ. यापैकी कोणताही एक पुरावा असणे आवश्यक आहे.
- जन्मतारखेचा पुरावा
- जात प्रमाणपत्र पुरावा. (सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करुन दिलेले जात प्रमाणपत्र असावे.)
- उत्पन्नाचा दाखला (उत्पन्नाचा दाखला रु. १लाखापेक्षा कमी उत्पन्न.) प्रवेश प्रक्रीया सुरु होणाऱ्या एक वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा, उदा. सन २०२४-२५ मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन २०२२-२३ किंवा २०२३-२४ या वर्षातील उत्पन्नाचा दाखला प्रवेशाकरीता ग्राहय समजण्यात येईल.
- दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा जिल्हा शल्य चिकित्सक/वैद्यकीय अधिक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रूग्णालय यांचे ४० टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता : भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.
भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरीता आवश्यक कागदपत्रे
- भाडेकरार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृतच असावा.
- भाडेकरार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी ११ महिन्यांचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा.
- जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडेकराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल.
- ज्या ठिकाणचा भाडेकरारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक / पालक राहत नाही असे आढळून आल्यास त्या पालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येवून सदर बालकाचा प्रवेश रद्द करण्यात येईल तसेच आरटीईमधून प्रवेश झाला तरीही संपूर्ण फी संबंधित पालकाने भरावी लागेल.
आरटीई २५ टक्के प्रवेशाकरिता वयोमर्यादा
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतूदींनुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय ६+ गृहित धरताना मानीव दिनांक ३१ डिसेंबर निश्चित करणेत आलेला आहे. सविस्तर येथे पहा
'आरटीई' प्रवेशासाठी 75 हजार 961 शाळांची नोंदणी पूर्ण
राज्यातील जवळपास 75 हजार 961 शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असून, या शाळेत 9 लाख 72 हजार 768 (RTE Vacancy) प्रवेश क्षमता असल्याचे सध्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.
यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्यातील 5 हजार 51 शाळा नोंदणी झाली असून, अहमदनगर जिल्ह्यातील 4 हजार 54 शाळा तर नाशिक जिल्ह्यातील 4 हजार 14 शाळांची नोंदणी पूर्ण झाली आहे. जिल्हानिहाय RTE शाळा आणि जागा आकडेवारी येथे पहा
आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे टप्पे येथे पहा
RTE PORTAL : RTE Admission Online Application