MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या पदाचा निकाल जाहीर

MPSC Tax Assistant Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, मधील कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

$ads={1}

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून या पदाचा निकाल जाहीर

MPSC Result

महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा-२०२३, मधील कर सहायक, गट-क या संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरिता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

सदर अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी ही निव्वळ टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी असून उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी पडताळणी अंती काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये / शिफारशीमध्ये बदल होऊ शकतो.

खेळाडूसाठी आरक्षित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची क्रीडाविषयक कागदपत्रे प्राधिकृत क्रीडा अधिका-यांनी तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून त्यांचा खेळाडू प्रवर्गाचा दावा तात्पुरता ग्राह्य धरण्यात आला असून अर्हताप्राप्त उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन आरक्षणाचा दावा करणाऱ्या व अर्हताप्राप्त यादीत समावेश झालेल्या उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्याासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून २ वर्षाचा कालावधी व २ संधी अनुज्ञेय असल्यामुळे अशा उमेदवारांना टंकलेखन चाचणी अनिवार्य नाही.

मोठी बातमी! अखेर आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरु

प्रस्तुत अर्हताप्राप्त उमेदवारांची यादी मा. न्यायालय / मा. न्यायाधिकरण येथे दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.

टंकलेखन कौशल्य चाचणी अर्हताकारी / पात्रता (Qualifying) स्वरुपाची असून त्याबाबत उमेदवारांना आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रकाद्वारे स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल.

महावितरण कंपनीमध्ये नवीन सरळसेवा भरती सुरु

राज्यातील असंघटित कामगारांसंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय!

$ads={2}

राज्यात तब्बल 17 हजार 499 पदांची पोलीस भरती सुरु

सुवर्णसंधी! या विभागात 468 जागांसाठी नवीन मोठी भरती

आरटीईच्या महाराष्ट्रातील जिल्हानिहाय शाळा आणि जागा येथे पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा