MSEB Recruitment 2024 :महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक (लेखा), विद्युत सहाय्यक, पदवीधर शिकाऊ अभियंता (वितरण)/ (स्थापत्य) पदे भरण्यासाठी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
$ads={1}
महावितरण कंपनीमध्ये नवीन सरळसेवा भरती सुरु
महावितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत खालील नमूद पदे भरण्यासाठी दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिराती प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्दी देण्यात आलेली होती.
- पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
- एकूण जागा - 5347
- पदाचे नाव: कनिष्ठ सहाय्यक (लेखा) Junior Assistant (Accounts)
- एकूण रिक्त जागा : 468
त्यानुसार ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरीताची वेबलिंक (URL Link) कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून, ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २०/०३/२०२४ अशी दिलेली होती.
तथापि, बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता मुदतवाढ देणेबाबत विनंती केली आहे. सबब, उक्त पदाकरीता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९/०४/२०२४ पर्यंत वाढविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याकरीताची वेबलिंक, रिक्त पदे, शैक्षणिक अर्हता, अटी व शतों, सविस्तर जाहिराती कंपनीच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत.
कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय!तसेच अंतर्गत अधिसूचना क्र. ०१/२०२४ ची वेबलिंक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांची नोंद घ्यावी, ही विनंती. असे प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.
विद्युत सहाय्यक पदाची सविस्तर जाहिरात येथे पहा
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) पदाची सविस्तर जाहिरात येथे पहा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या संवर्गाचा अंतिम निकाल जाहीर
मोठी बातमी! महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन महत्वाचे अपडेट पहा
$ads={2}
कर्मचाऱ्याच्या निवृत्तीवेतनासंदर्भात महत्वाचा शासन निर्णय!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय!