MSEDCL Recruitment 2024 Apply Online : नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी संधी, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (Mahavitaran) मर्यादितच्या कार्यकक्षेत येणाऱ्या कार्यालयातील विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदाच्या तब्बल 5347 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु झाले आहे, विशेष म्हणजे या पदाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर सेवेत सामावून घेण्यात येते.
$ads={1}
महावितरण विभागात 5347 जागांसाठी मेगा भरती सुरु
- पदाचे नाव : विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
- एकूण जागा - 5347
सदर कालावधीत देण्यात येणार मानधन
निवड झालेल्या उमेदवारांना खालीलप्रमाणे प्रतिमहा मानधन देण्यात येईल.
- अ) प्रथम वर्ष - एकूण मानधन रुपये १५,०००/-
- ब) द्वितीय वर्ष - एकूण मानधन रुपये १६,०००/०
- क) तृतीय वर्ष - एकूण मानधन रुपये १७,०००/- उपरोक्त मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजावट करण्यात येईल, भविष्य निर्वाह निधीच्या अनुषंगाने निवृत्ती वेतनाची रक्कम निवृत्ती वेतन योजनेमध्ये नियमानुसार जमा करण्यात येईल.
कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर या पदावर समायोजन होणार
महावितरण अंतर्गत वेतनगट-४ मधील विभागस्तरीय सेवाज्येष्ठतेतील पदे सरळसेवा भरतीद्वारे ३ वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्याकरीता अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पध्दतीने मागविण्यात आले आहेत. या पदाचा ३ वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून सदर उमेदवारांना 'तंत्रज्ञ' (Technician) वा नियमित पदावर सामावून घेण्यात येणार आहे.
विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमीत पदावर रु. २५८८०-५०५-२८४०५-६१०-३४५०५-७५०- ५०८३५ या वेतनश्रेणीमध्ये घेण्यात येईल.
आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती येथे पहाशैक्षणिक अर्हता - Mahavitaran Recruitment Educational Qualification
दिनांक २९/१२/२०२३ रोजी विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदासाठी खालील शैक्षणिक अहर्ता पूर्ण असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीण प्रमाणपत्र किया तत्सम परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे.
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी वीजतंत्री, तारतंत्री अथवा सेंटर ऑफ एलेक्ट्रीक कटर व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले दोन वर्षाचा पदविका (वीजतंत्री, तारतंत्री) अभ्यासक्रम प्रमाणपत्र आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
- उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे पूर्ण व कमाल वय २७ वर्षे असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीयांसाठी तसेच आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील (ई.डब्ल्यू एस.) उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथिलक्षम राहील.
- दिव्यांग उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षापर्यंत शिथिलक्षम राहील.
- माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षाची राहील.
- महावितरण कंपनीमधील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादेची अट लागू राहणार नाही.
निवड पध्दत
अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरुपाची (Objective Type) ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणी घेण्यात येईल. सदर चाचणी हो पदासाठी आवश्यक असलेले किमान अहर्ता, सामान्य ज्ञान व पदासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानावर आधारीत राहील, परीक्षेचे माध्यम मराठी इंग्रजी राहील, ऑन लाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या उमेदवारांना ऑन लाईन तांत्रिक क्षमता चाचणीकरीता बोलविण्यात येईल.
सदर ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी (Online Exam) सर्वसाधारणपणे माहे फेब्रुवारी / मार्च-२०२४ मध्ये घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पध्दत
उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने नमुना अर्ज व माहिती www.mahadiscom.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार अर्ज कंपनीच्या संकेत स्थळावरुन डाऊनलोड करु शकतात, यासोबत दिलेल्या लिंकवर ऑन लाईन अर्ज भरण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
महत्वाच्या तारखा
- ऑनलाइन अर्ज सुरुवात : 01/03/2024
- शेवटची तारीख : 19/04/2024