मोठी बातमी! शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर

Teacher Recruitment Press Release Announced 2024 : राज्यातील Pavitra Portal Teacher Recruitment (शिक्षक भरती) संदर्भात नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आले आहे, आता शिक्षक भरती नियुक्ती प्रक्रिया संदर्भात महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत, सविस्तर वाचा..

$ads={1}

मोठी बातमी! शिक्षक पदभरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर

Teacher Recruitment Press Release Announced


शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ (Pavitra Portal Teacher Recruitment)नुसार शिक्षक पदभरतीची पहिली शिफारस यादी दिनांक २५/०२/२०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली, उमेदवारांची शिफारस यादी प्रसिद्ध केल्यानंतर ज्या उमेदवारांना स्वतःच्या निवडीबाबत काही शंका असल्यास, त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे तक्रार/निवेदन करण्याची सुविधा देण्यात आली होती. अधिकृत ईमेल आयडीवर विहित नमुन्यात प्राप्त अर्जाची छाननी जवळपास पूर्ण झाली आहे.

दिनांक ०४/०४/२०२४ अखेर विहित नमुन्यात प्राप्त तक्रार अर्जावर कार्यवाही करून उमेदवारांच्या ईमेलवर समितीचा निर्णय दिनांक ०२/०४/२०२४ पासून कळविण्यात आला होता.

दिनांक ०४/०४/२०२४ अखेर पर्यंत निर्णय कळविलेल्या अर्जाची संख्या ४५३ इतकी आहे. तसेच अन्य ईमेलवर वेळोवेळी योग्य तो प्रतिसाद देण्यात आला आहे.

उर्वरित तक्रार अर्जावर पुढील काही दिवसांत समितीचा निर्णय कळविण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले होते.

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सध्या लागू आहे. यास्तव निवडणूक आयोगाकडून शिक्षक पदभरतीबाबत परवानगी प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले होते.

शिक्षक पद भरतीबाबत नवीन प्रसिद्धीपत्रक जाहीर

दिनांक १९/०४/२०२४ रोजीच्या शिक्षक पद भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले असून, खालील प्रमाणे सूचना देण्यात आल्या आहेत. 

पवित्र पोर्टल मार्फत दिनांक २५/०२/२०२४ रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन/जाहिरातनिहाय प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरु करण्यात आली होती.

दरम्यान मा. भारत निवडणूक आयोग यांनी लोकसभा- २०२४ निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले.

तथापि, या विषयाची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरु ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी या कार्यालयाने शासनामार्फत मा. भारत निवडणूक आयोग यांच्याकडे प्रस्ताव सादर केला.

यासंदर्भात मा. भारत निवडणूक आयोग यांनी नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करणेस परवानगी दिली असून तसे शासन पत्र दिनांक १९/०४/२०२४ अन्वये या कार्यालयास कळवणेत आले आहे. त्यानुसार वरील प्रमाणे कार्यवाही करण्याबाबत नियुक्ती प्राधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहेत. 

मोठी बातमी! राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षातील वेळापत्रक जाहीर

गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

$ads={2}

आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती येथे पहा

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

तुमचे नाव मतदार यादीत चेक करा

Previous Post Next Post