Exemption of Students from Attending School : राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणेबाबतच्या प्रस्तावास अखेर मान्यता मिळाली आहे.
$ads={1}
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!
प्रस्तावाच्या अनुषंगाने निर्देश देण्यात आहे की, राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देणे आवश्यक आहे.
त्यामुळे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यासंदर्भात खालील सूचना देण्यात आल्या आहेत.
- राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२.०४.२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत देण्यात येत आहे.
- राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना उपस्थित राहणेपासून सवलत देण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा.
- आगामी शैक्षणिक वर्षात शाळा सुरु करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक २०.०४.२०२३ नुसार कार्यवाही करावी.
- वरील सूचनांचे पालन होईल याबाबतची दक्षता शिक्षण संचालक (प्राथमिक) व शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमक) यांनी घ्यावी. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
मोठी बातमी! दहावी-बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच येथे पाहता येणार निकाल
आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा का दिसत नाही?
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज असा भरा
$ads={2}
आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा का दिसत नाही? काय आहे कारण