मोठी बातमी! दहावी-बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच! निकालाची तारीख काय? | Maharashtr Board 10th 12th Result Date 2024

Maharashtr Board 10th 12th Result Date 2024 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी-बारावी परीक्षेचा निकाल यंदा पहिल्यांदाच मे महिन्यात जाहीर होणार असल्याची महत्वाची अपडेट समोर आली आहे, त्यादृष्टीने राज्य मंडळ जलदगतीने तयारी करीत असून, या वर्षीच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता लागली आहे, या परीक्षांचे निकाल कधी? आणि सर्वात आधी तुम्ही हा निकाल कोठे पाहू शकता, (HSC SSC Result 2024 Official Website) याबाबत सविस्तर माहिती सविस्तर पाहूया.

$ads={1}

मोठी बातमी! दहावी-बारावीचा निकाल यंदा मे महिन्यातच!

Maharashtr Board 10th 12th Result Date 2024

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२4 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १० वी, १२ वी) परीक्षा घेण्यात आली होती.

मागील वर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या (दि २५) तारखेला (दु २ वाजता) जाहीर करण्यात आला होता, तर दहावीचा निकाल (दि 2 जून) रोजी दुपारी 1 वाजता जाहीर करण्यात आला होता. आता या वर्षीच्या परीक्षांचे निकाल कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी पालकांमध्ये उत्सुकता लागली आहे.

बारावी परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर होणार

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या विविध मागण्यांसंदर्भात त्यांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर फेब्रुवारी महिन्यात शालेय शिक्षण मंत्री यांच्या समवेत महत्वाची बैठक झाली, यावेळी आयटी आणि इतर शिक्षकांचे समायोजन, १२ आणि २४ वर्षानंतरची कालबद्ध पदोन्नती, २४ वर्षानंतर २० टक्क्याप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे, याचप्रमाणे काही दीर्घकालीन मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली, बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर शिक्षक संघाने इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला असल्याचे जाहीर केले होते, त्यामुळे आता बारावी परीक्षांचा निकाल वेळेत जाहीर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दहावी-बारावीचा निकाल या तारखेला जाहीर होणार

यंदा लोकसभा निवडणुकीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार असल्याने, त्यापूर्वीच लोकप्रिय मीडिया रिपोर्टनुसार १२ वीचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तर चौथ्या आठवड्यात १० वी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने राज्य मंडळ जलदगतीने तयारी करीत असल्याची माहिती राज्य मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य मंडळाकडून नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा 1 ते 26 मार्च आणि बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च यादरम्यान घेण्यात आली होती.

मोठी बातमी! जेईई परीक्षेचा निकाल जाहीर, राज्यातील या विद्यार्थ्यांची जेईई परीक्षेमध्ये उत्तुंग भरारी

दहावी-बारावीचा निकाल कोठे व कसा पाहता येईल? | HSC SSC Result 2024 Official Website

  • Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट (HSC SSC Exam Result 2024 Official Website) ला भेट द्या - बोर्ड वेबसाईट - mahresult.nic.in
  • Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा HSC SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर
  • Step 3 : तुम्हच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास  'XXX' असे टाका  (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)
hsc ssc board exam result 2024
  • Step 4 : आता View Result या बटनावर क्लिक करा तुमचा निकाल स्क्रीन वर दिसेल  (सर्व विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा..!! )
  • Step 5 :  तुमचा निकाल PDF मध्ये Save करा आणि प्रिंट करा.
  • दहावी बारावीचा निकाल SMS द्वारे मोबाईलवर असा चेक करा

    Maharashtra SSC/HSC Result On SMS : दहावीचा निकाल पाहण्यासाठी एकदम साईट वर लोड आल्यास मोबाईलवर SMS द्वारे पाहता येणार आहे. त्यासाठी खालील स्टेप फॉलो करा

    • मोबाईल मधील Messaging App ओपन करा
    • तिथे उजव्या बाजूच्या + या आयकॉन वर क्लिक करा
    • त्यांनतर कॅपिटलमध्ये MHSSC दहावीसाठी, MHHSC बारावीसाठी असे टाईप करा, आणि त्यापुढे तुमचा  रोल नंबर टाइप करा.
    • हा एसएमएस SMS 57766 या क्रमांकावर पाठवा.
    • क्षणात तुमच्या निकालाचा मेसेज तुम्हाला मिळेल.

    दहावी बारावी निकाल कधी जाहीर होणार?

    दहावी, बारावी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा बाबत निकालाची तारीख अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही, मात्र निकालाचे प्रत्येक अपडेटसाठी तुम्ही (https://results.gov.in https://mahresult.nic.in) या अधिकृत संकेतस्थळास वेळोवेळी भेट देऊ शकता.

    मोठी बातमी! राज्यातील नवीन शैक्षणिक वर्षातील वेळापत्रक जाहीर

    गुड न्यूज! राज्यातील या कर्मचाऱ्यांना सुधारित भत्ता मंजूर, शासन निर्णय जारी

    $ads={2}

    आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती येथे पहा

    राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!

    मोठी बातमी! कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू, शासन निर्णय जारी

    Previous Post Next Post