RTE Admission FAQ 2024 25 : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया दरवर्षी राज्यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी राबवली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनामार्फत ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे, यासंदर्भात ऑनलाईन अर्ज करण्यापासून ते बालकांचा लॉटरी पद्धतीने निवड होईपर्यंत अनेक प्रश्न उपस्थित होत असतात, RTE २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संदर्भात उपस्थित होणारे, वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि त्याचे उत्तर या आर्टिकल मध्ये असणार आहे.
$ads={1}
आरटीई (RTE 25%) टक्के प्रवेश प्रक्रिया वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि उत्तरे | RTE Admission FAQ 2024 25
प्रश्न - RTE चा Full Form काय आहे?
उत्तर - RTE चा फुल फॉर्म Right To Education (शिक्षणाचा अधिकार) असा आहे.
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश योजना काय आहे?
उत्तर - बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ म्हणजेच (RTE Act 2009) शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील खाजगी शाळामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी २५ टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यांतर्गत मुलांना प्राथमिक शिक्षण पूर्णतः मोफत मिळते.
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश योजना कोणासाठी आहे?
उत्तर - RTE 25 टक्के प्रवेश योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांसाठी आहे.
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश योजना मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल म्हणजे काय?
उत्तर - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.१ लाखापर्यंत आहे. अशा गटाचा उल्लेख RTE 25 टक्के प्रवेश योजनेसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये करण्यात आला आहे.
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश योजना वंचित घटकांमध्ये कशाचा समावेश होतो?
उत्तर - वंचित गटामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, वि.जा.(अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), इतर मागासवर्ग (OBC), विशेष मागासवर्ग (SBC), दिव्यांग बालके, एच. आय. व्ही. बाधित/ एच. आय. व्ही. प्रभावित बालके , (एक्स-१) अनाथ बालक , (एक्स-२) कोव्हीड प्रभावित बालक ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले. यांचा RTE 25 टक्के प्रवेश योजनेसाठी वंचित गटामध्ये समावेश होतो.
आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा का दिसत नाही? काय आहे कारण
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश योजनेंतर्गत कोणत्या प्रकारच्या शाळेत प्रवेश मिळतो?
उत्तर - राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व बोर्डाच्या (राज्यमंडळ, CBSE, ICSE व IB सह) विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित Jr KG, Sr KG, प्राथमिक वर्ग १ ली किंवा पूर्व प्राथमिकस्तरावरील सर्व शाळांचा यामध्ये समावेश आहे. (मदरसा, मक्तब, धार्मिक पाठशाळा, अल्पसंख्यांक शाळा वगळून)
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश योजनेंतर्गत कोणत्या इयत्ते पर्यंत शिक्षण मोफत मिळते?
उत्तर - RTE 25 टक्के प्रवेश योजनेंतर्गत पूर्वप्राथमिक प्ले ग्रुप/ नर्सरी ते आठवी पर्यंतचे शिक्षण मोफत मिळते.
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश योजनेंतर्गत प्ले ग्रुप /नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी साठी फॉर्म भरता येतो का?
उत्तर - RTE 25 टक्के प्रवेश योजनेंतर्गत प्ले ग्रुप /नर्सरी, ज्युनियर आणि सिनियर केजी साठी ऑनलाईन फॉर्म भरता येतो. मात्र त्यासाठी बालकाच्या घरापासून १ किमी च्या आत शाळा असणे आवश्यक आहे. आणि त्या शाळेने RTE २५ टक्के योजनेसाठी नोंदणी केलेली असावी.
प्रश्न - आरटीई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र वयोमर्यादा किती आहे?
उत्तर - आरटीई प्रवेश 2024-25 महाराष्ट्र वयोमर्यादा कमीत कमी 4.5 वर्ष ते जास्तीत जास्त 7.5 वर्ष आहे. सविस्तर येथे पहा
प्रश्न - 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती मुले प्रवेश घेण्यास पात्र आहेत?
उत्तर - दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.1लाखापर्यंत आहे. अशा पालकांची मुले 25% ऑनलाईन प्रवेश घेण्यास पात्र आहेत.
प्रश्न - उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या ठिकाणचा पाहिजे ?
उत्तर - उत्पन्नाचा आणि जातीचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही. ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, त्याच ठिकाणचा असावा.
प्रश्न - खुला प्रवर्ग, अल्पसंख्यांक, यांना प्रवेशासाठी कोणकोणती कागदपत्रे / प्रमाणपत्रे आवश्यक आहेत?
उत्तर - जन्माचा दाखला, रहिवासी, पुरावा, (आधारकार्ड/पासपोर्ट/मतदार ओळखपत्र, वीज बिल / टेलिफोन बिल/पाणी पट्टी/वाहन चालविण्याचा परवाना रेशनिंग कार्ड / राष्ट्रीयकृत बँकचे पासबुक/ भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडेकरार नाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक) व कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु. एक लाखापेक्षा कमी असल्याच उत्पन्नाचा दाखला.
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश अंतर्गत ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येतो?
उत्तर - RTE 25 टक्के प्रवेश अंतर्गत एका बालकाकरिता एकच अर्ज भरता येईल. एकाच बालकाचे 2 किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील.
प्रश्न - RTE ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना त्यामध्ये पत्ता कोणता टाकावा?
उत्तर - RTE ऑनलाईन प्रवेश अर्जात घराचा पत्ता लिहिताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते कागदपत्र देणार आहे त्यावरील पत्ता अचूक भरावा. (जे रहिवासी म्हणून कागदपत्र तुम्ही सादर करणार आहे त्यावरील पत्ता टाकावा.)
प्रश्न - RTE अंतर्गत यापूर्वी प्रवेश मिळालेल्या बालकाचा ऑनलाईन अर्ज भरता येईल का?
उत्तर - नाही, यापूर्वी आर.टी.ई. अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये.
प्रश्न - RTE 25 टक्के प्रवेश अंतर्गत ऑनलाईन अर्ज किती वेळा भरता येतो?
उत्तर - RTE 25 टक्के प्रवेश अंतर्गत एका बालकाकरिता एकच अर्ज भरता येईल. एकाच बालकाचे 2 किंवा त्याहून अधिक अर्ज भरलेले आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील.
प्रश्न - RTE 25 टक्के ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना माहिती चुकल्यास काय करावे?
उत्तर - RTE ऑनलाईन प्रवेश अर्ज माहिती भरताना चुकल्यास, तो रद्द [Delete Application) करून पुन्हा भरावा. कोणत्याही परिस्थितीत Duplicate अर्ज भरू नयेत.
आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन अर्ज - पालकांकरीता महत्वपूर्ण सूचना पहा
प्रश्न - RTE Admission 2024 25 करिता कोणते नियम बदलले आहे?
उत्तर - पुढील सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील नुकताच शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, खाजगी विनाअनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात, जर शासकीय किंवा अनुदानित शाळा असल्यास त्या शाळेत आता RTE 25% प्रवेश मिळणार नाही. सविस्तर येथे वाचा..
प्रश्न - RTE Admission 2024 25 करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे?
उत्तर - पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील प्रवेशासाठी RTE Admission 2024 25 करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दिनांक 30 एप्रिल 2024 पर्यंत आहे.
पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; केंद्र सरकारचे सर्व राज्यांना निर्देश
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज असा भरा
RTE ऑनलाईन अर्ज ते लॉटरी पद्धतीने निवड संपूर्ण माहिती
प्रश्न - RTE Admission 2024 25 करिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती आहे?
$ads={2}
राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसंदर्भात शालेय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय!आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी मानिव दिनांकावरून काढा प्रवेशासाठी लागणारे वय
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा!