RTE Admission 2024-25 : मोठी बातमी! आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरु, ऑनलाईन अर्ज पालकांना या तारखेनंतर भरता येणार

RTE Admission 2024-25 Maharashtra Start Date : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया आता सुरु झाली असून, RTE च्या पहिल्या टप्प्यातील शाळांच्या नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, व त्यानुसार संबंधित जिल्ह्यांना याबाबत कार्यवाही सुरु करणेबाबत परिपत्रकानव्ये कळविण्यात आले आहे, सविस्तर वाचा..

$ads={1}

मोठी बातमी! आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरु

RTE Admission 2024-25

आरटीई २५ टक्के प्रवेश कोट्यातून खाजगी शाळांमध्ये प्रवेश मोफत घेण्यासाठी राज्य शासनातर्फे ही प्रक्रिया राबवली जाते. यावर्षी आर टी ई ची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू केलेली असून, पहिल्या टप्प्यांमध्ये शाळांच्या नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. 

सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता जिल्हयांतील आरटीई पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करणेबाबत महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले असून, आता RTE प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खालील व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला/मुलीसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.

शासनाच्या निर्देशनानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांची अधिसूचना दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ अधिसूचना निर्गमित झालेली असून, सदर अधिसूचनेमध्ये सुधारित नियम नमूद केलेले आहेत.

त्यानुसार खालील नमूद व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन करण्याबाबत कळविण्यात आले आहे, त्यानुसार दरवर्षीप्रमाणे सन २०२४-२५ या वर्षांची आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबविण्यात येणार आहे.

  1. महानगरपालिका शाळा (Municipal Corporation)
  2. नगरपालिका / नगरपरिषद / नगरपंचायत शाळा
  3. कंटोमेंट बोर्ड शाळा
  4. जिल्हा परिषद शाळा
  5. महानगरपालिका शाळा (स्वयं अर्थसहाय्यीत शाळा)
  6. जिल्हा परिषद (माजी शासकीय शाळा)
  7. खाजगी अनुदानित शाळा (Private aided schools)
  8. स्वयंअर्थसहाय्यीत शाळा (Self Finance school)
  9. पोलीस कल्याणकारी शाळा

त्याकरीता जिल्हयातील २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांची नोंदणी दिनांक ६ मार्च २०२४ ते दिनांक १८ मार्च २०२४ या कालावधी मध्ये करण्यात येणार आहे. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया लागू असलेल्या सर्व पात्र शाळांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेश ऑनलाईन अर्ज पालकांना या तारखेनंतर भरता येणार | RTE Admission 2024-25 Maharashtra Start Date

RTE Admission 2024-25 प्रक्रिया साधारणपणे वेगवेगळ्या टप्यामध्ये पार पडत असते, त्यामध्ये पहिल्या टप्यात वरील व्यवस्थापनाच्या पात्र शाळांचे रजिस्ट्रेशन सुरु करण्यात आले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे

  1. आरटीई प्रवेशासाठी शाळांची नोंदणी
  2. विद्यार्थी नोंदणी RTE New Registration
  3. ऑनलाईन अर्ज - RTE Online Application 
  4. विद्यार्थी माहिती भरणे - Child Information
  5. ऑनलाईन अर्ज भरणे - RTE Online Application 
  6. आरटीई शाळा निवड - School Selection
  7. भरलेल्या अर्जाची स्थिती - Summary - Application Details
  8. प्रवेशपत्र - Admit Card

पहिल्या टप्यातील शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच सध्या दिलेल्या नियोजित तारखेनुसार दिनांक १८ मार्च पर्यंत शाळांची नोंदणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्पा म्हणजे प्रत्यक्ष विद्यार्थी नोंदणी म्हणजेच पालकांना RTE साठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नेमके वय किती? शिक्षण विभागाने दिली माहिती

आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्याच्या संदर्भात नवीन शासन निर्णय!

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा!

$ads={2}

आरटीई 25 टक्के प्रवेश शुल्क प्रतिपूर्तीचा दर शालेय शिक्षण विभागाकडून निश्चित

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा