RTE GR : आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्याच्या संदर्भात नवीन शासन निर्णय!

RTE Education Fees GR : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (c) नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर संबंधीत वर्गातील विद्यार्थी संख्येच्या कमीत कमी २५% जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे, आता आरटीई २५% अंतर्गत प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती संदर्भात दिनांक १३ मार्च २०२४ रोजी नवीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

आरटीई 25 टक्के अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्याच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती संदर्भात नवीन शासन निर्णय

RTE Education Fees GR

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (C) व कलम १२ (२) अन्वये केलेल्या तरतूदींच्या अनुषंगाने आरटीई २५% प्रवेश देण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती करण्यासाठी रू. ६१.२५ कोटी (रूपये एकसष्ट कोटी पंचवीस लक्ष फक्त) इतका निधी शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडे सुपूर्द करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ कायद्यांतर्गत ज्या शाळांनी कमीत कमी २५ टक्के जागांवर वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना प्रवेश दिले आहेत, अशा शाळांनी इ.१ ली ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यासाठी आकारण्यात येणा-या शैक्षणिक शुल्काचा तपशील सरल या पोर्टलवर अथवा आरटीई पोर्टलवर जाहीर केलेला असावा. ज्या शाळांचे स्वतःचे संकेतस्थळ (Website) आहे. अशा शाळांनी शुल्काचा तपशील संकेतस्थळावर देखील जाहीर केलेला असावा.

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संदर्भात नवीन परिपत्रक जारी

तसेच शाळेने शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत आरटीई ची मान्यता प्राप्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडावे. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन लॉटरी पद्धतीने यापूर्वी ज्या शाळेत प्रवेश मिळालेला आहे, असे विद्यार्थी संबंधीत शाळेतच शिकत असल्याची खात्री सरल व आरटीई पोर्टल वरून करावी. असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. (शासन निर्णय)

आरटीई 25 टक्के प्रवेश निवड कशी होते? जाणून घ्या

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नेमके वय किती? शिक्षण विभागाने दिली माहिती

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया संदर्भात नवीन परिपत्रक जारी
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा