RTE Admission age Limit 2024 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी RTE अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते, प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रातील आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे.
$ads={1}
आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नेमके वय किती? शिक्षण विभागाने दिली माहिती
सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाच्या आरटीई २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया आता सुरु झाली असून, RTE च्या पहिल्या टप्प्यातील शाळांच्या नोंदणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार दिनांक ११ मार्च २०२४ पर्यंत 265 शाळांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झाले असून, यामध्ये 5530 बालकांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील सर्व पात्र शाळांची नोंदणी करण्याकरिता दिनांक १८ मार्च २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे.
पुढील सन 2024-25 शैक्षणिक वर्षातील प्रवेशासंदर्भात नुकताच शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून, तशी अधिसूचना (RTE Gazette) जारी करण्यात आली आहे. या वर्षातील आरटीई प्रवेश वयोमर्यादा किती असणार? याबाबत पालकांच्या मनात प्रश्न असून, मुलाचे वय किती असणे आवश्यक आहे? याबाबत आता प्राथमिक शिक्षण संचालनालयाने बालकाचे किमान आणि कमाल वयोमर्यादा निश्चित केली आहे.
प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर / सिनियर केजी, पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित
दिनांक २५ जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात आल्या आहेत.
शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८ सप्टेंबर २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे.
शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे, कमाल वयोमर्यादा नाही. मानिव दिनांक बदलामुळे माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यात जन्मलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा दिनांक ३१ डिसेंबर २०२४ अखेर खालील प्रमाणे राहील.
सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी बालकाचे वय
- प्ले ग्रुप आणि नर्सरी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी ३ वर्ष असणे आवश्यक आहे. (कमाल वय ४ वर्ष ५ महिने ३० दिवस)
- ज्युनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी ४ वर्ष असणे आवश्यक आहे. (कमाल वय ५ वर्ष ५ महिने ३० दिवस)
- सिनियर केजी साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी ५ वर्ष असणे आवश्यक आहे. (कमाल वय ६ वर्ष ५ महिने ३० दिवस)
- इयत्ता १ ली साठी बालकाचे किमान वय दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी ६ वर्ष असणे आवश्यक आहे. (कमाल वय ७ वर्ष ५ महिने ३० दिवस)
RTE प्रवेशासाठी बालकाचा जन्म या तारखेदरम्यान झालेला असावा?
- प्ले ग्रुप आणि नर्सरी साठी बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०२० ते दिनांक ३१ डिसेंबर २०२१ यादरम्यान झालेला असावा.
- ज्युनियर केजी साठी बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१९ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२० यादरम्यान झालेला असावा.
- सिनियर केजी साठी बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१८ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१९ यादरम्यान झालेला असावा.
- इयत्ता १ ली साठी बालकाचा जन्म दिनांक १ जुलै २०१७ ते दिनांक ३१ डिसेंबर २०१८ यादरम्यान झालेला असावा. (परिपत्रक)