Contractual Employees Regularisation : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी यांना शासनसेवेत नियमित पदावर समायोजन करणेबाबत, मा. मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षतेखाली नोव्हेंबर महिन्यात महत्वाची बैठक संपन्न झालेली असून, या बैठकीत सलग 10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत निर्णय घेण्यात आला आहे, आता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 10 वर्ष सलग सेवा पूर्ण झालेल्या कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांची माहिती मागविण्यात आली आहे.
$ads={1}
सलग 10 वर्ष सेवा झालेले कंत्राटी कर्मचारी कायम होणार?
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत निर्णय नोव्हेंबर महिन्यामध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात घेण्यात आला होता. त्यानुसार दिनांक 8 नोव्हेंबर 2023 रोजीच्या पत्रान्वये शासनाने मान्यता दिली आहे.
सदर बैठकीत घेण्यात आलेल्या निर्याणानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत शहरी ग्रामीण व NUHM अंतर्गत कार्यरत तसेच एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना वयाची अट शिथील करुन नियमित रिक्त पदांवर समायोजन करण्यासाठी धोरणात्मक निर्णय त्वरीत घेण्याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.
आरोग्य विभागात दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदांवर सरळसेवेने भरण्यात येणाऱ्या कोट्यापैकी सरळसेवेने 70 टक्के व उर्वरीत 30 टक्के पदांवर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 10 वर्षे किंवा 10 वर्षा पेक्षा जास्त सलग सेवा झालेल्या कंत्राटी (तांत्रिक/अतांत्रिक) कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याकरीता वयाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
तसेच आरोग्य विभागातील नियमित पदांकरीतांचे सेवा प्रवेश नियमामध्ये आवश्यक ते बदल व दुरुस्ती करुन मान्यता प्राप्त करुन घेण्याचा प्रस्ताव शासनास तात्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात यावेळी देण्यात आले आहे.
या तारखेपर्यंत सलग 10 वर्ष सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची मागविली माहिती
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १० वर्ष पूर्ण झालेल्या कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांची माहिती राज्य शासनास तात्काळ सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्य विभागीय/ जिल्हा / महानगरपालिका NTEP/ प्रशिक्षण केंद्रे इत्यादी स्तरावरील १० वर्ष सलग सेवा दि. ३१ मार्च २०२४ रोजी पूर्ण होत असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांची माहिती आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे कार्यालयाने दिनांक ५ मार्च २०२४ रोजीच्या पत्रानव्ये तात्काळ माहिती मागविली आहे.
कंत्राटी या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न
कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचा मोठा निर्णय!