Employees Increase Salaries : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वरीष्ठ निवासी (सेवा) यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, आता याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
$ads={1}
गुड न्यूज! आरोग्य विभागातील या कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव वाढ
राज्यातील शासकीय वैद्यकीय / दंत/ आयुर्वेद महाविद्यालयांमधील (कनिष्ठ निवासी-१,२,३ व वरीष्ठ निवासी-१,२,३) या पदव्युत्तर अभ्याक्रमाच्या विद्यार्थ्यांना अदा करण्यात येणा-या विद्यावेतनाच्या दरात वाढ करणेबाबत राज्यातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेमार्फत शासनास विनंती करण्यात आली होती.
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ७ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित बैठकीमध्ये राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय/ दंत/ आयुर्वेद महाविद्यालयांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्या-या (कनिष्ठ निवासी-१,२,३ व वरीष्ठ निवासी-१,२,३) यांच्या विद्यावेतनात रुपये १०,०००/- प्रतिमाह इतकी ठोक वाढ करणेबाबत मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांनी निर्देश दिले होते.
सदर पार्श्वभूमीवर मा. मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील वरीष्ठ निवासी (सेवा) यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक ४ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
महागाई भत्यासह 1 मार्च पासून मिळणार लाभ
त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय/ दंत/ आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी यांच्या विद्यावेतनात दिनांक १ मार्च, २०२४ पासून वेळोवेळी अनुज्ञेय महागाई भत्त्यासह प्रतिमाह रुपये १०,०००/- (रुपये दहा हजार फक्त) इतकी ठोक वाढ लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. (शासन निर्णय)
सलग 10 वर्ष सेवा झालेले कंत्राटी कर्मचारी कायम होणार?