Dearness Allowance : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात (Dearness Allowance) भरघोस वाढ करण्यात आली असून, आता कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ५० टक्के झाला आहे. तसेच ग्रॅच्युइटी, प्रवास, कँटीन व प्रतिनियुक्ती भत्यात देखील वाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
$ads={1}
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ; केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय!
केंद्र सरकारने गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (Dearness Allowance) ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सदरचा लाभ हा दिनांक १ जानेवारी २०२४ रोजीपासून कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार ही वाढ करण्यात आली आहे.
ऑक्टोबर २०२३ मध्ये DA मध्ये शेवटची वाढ करण्यात आली होती. त्यावेळीही ४ टक्क्यांची वाढ केल्यामुळे महागाई भत्ता ४६ टक्क्यांवर पोहोचला होता. आता या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मूळ वेतनाच्या ५० टक्के झाला आहे.
महागाई भत्ता वाढीचा लाभ ४९.१८ लाख कर्मचारी आणि ६७.९५ लाख निवृत्तिवेतनधारकांना मिळणार असल्याचे, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल म्हणाले, या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर १२,८६९ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
तसेच प्रवास भत्ता, कँटीन व प्रतिनियुक्ती भत्ता २५ टक्के व ग्रॅच्युइटी लाभ २५ टक्के वाढवला. यासह मंत्रिमंडळाने देशातील पहिल्या AI मोहिमेस देखील मंजुरी दिली आहे.
आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पालकांना या तारखेनंतर करता येणार अर्ज
राज्यातील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्वाचे निर्णय!
संरक्षणविषयक केंद्रीय समितीने १५ हजार कोटी रुपयांच्या स्टील्थ लढाऊ विमानांच्या प्रकल्पांसही मंजुरी दिली आहे. पाचव्या पिढीचे हे आधुनिक विमान देशातच तयार होईल. उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडरवर मिळणारी ३०० रुपयांची सबसिडी एक वर्षासाठी वाढवली आहे. त्यामुळे उज्जला योजनेअंतर्गत गरीब महिलांना १ एप्रिलपासून पुढील आर्थिक वर्षासाठी प्रति एलपीजी सिलिंडर अनुदान ३०० रुपये वाढ मिळणार आहे.
#WATCH | Union Cabinet approves hike in Dearness Allowance to govt employees and Dearness Relief to pensioners by 4% from January 1, 2024, announces Union Minister Piyush Goyal. pic.twitter.com/IsWUnwBGHW
— ANI (@ANI) March 7, 2024