Contractual Employee Regularization : करार पध्दतीने मानधन तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत रिक्त पदावर कायम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक दिनांक ४ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
करार पध्दतीने मानधन तत्वावरील कार्यरत कर्मचारी शासन सेवेत कायम
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर 'प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम फेज-२ अंतर्गत' लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई व वाहनचालक पदावर करार पध्दतीने मानधन तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना, इतर महानगरपालिकांमध्ये ज्याप्रमाणे रोजंदारीवरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे कायमस्वरूपी समावेशन करण्यात आले आहे.
त्याच धर्तीवर नवी मुंबई महानगरपालिका आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदावर नियमित समावेशन करणेबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात आला आहे.
आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका यांचे प्रस्तावाचे अवलोकन केले असता, नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर करार पध्दतीने मानधन तत्वावर कार्यरत ११ कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या विहीत प्रक्रियेने (जाहिरात/लेखी परिक्षा/ मुलाखत) झालेल्या आहेत. त्यामुळे विहीत मार्गाने नियुक्त झालेल्या सदर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा आकृतीबंध दि.२१.०८.२०१७ च्या शासन निर्णयान्वये मंजूर करण्यात आलेला आहे. सदर आकृतीबंधात लिपिक-५, डेटा एंट्री ऑपरेटर-१, शिपाई-४ व वाहनचालक-१ ही पदे मंजूर असून रिक्त आहेत.
त्यानुसार सदर करार पध्दतीने मानधन तत्वावर कार्यरत कर्मचाऱ्यांना दिनांक ४ मार्च २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
आकृतीबंधातील मंजूर व रिक्त पदांवर पुढील अटी व शर्तीच्या अधीन राहून कायम नियुक्ती देण्यात येणार
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरसीएच फेज-२ अंतर्गत कार्यरत असलेले लिपिक-५, डेटा एंट्री ऑपरेटर-१, शिपाई-४ व वाहनचालक-१ या कर्मचाऱ्यांचे समायोजन महानगरपालिकेच्या मंजूर आकृतीबंधातील समकक्ष रिक्त पदांवर करण्यात यावे. तसेच ज्या पदावर त्यांचे समायोजन करण्यात येईल त्या पदाची अर्हता त्यांनी पूर्ण करणे आवश्यक आहे.
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर आरसीएच फेज-२ अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणाचेही समायोजन करता येणार नाही.
- या कर्मचाऱ्यांना समावेशनाच्या दिनांकापासून कायम सेवेचे तद्अनुषंगिक लाभ (वेतन, सेवा जेष्ठता, निवृत्तीवेतन इत्यादी) देय असणार आहे.
- समायोजन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे पद त्यांच्या सेवानिवृत्ती किंवा इतर कारणास्तव रिक्त झाल्यास सदर पद महानगरपालिकेच्या सेवा प्रवेश नियमानुसार विहीत प्रक्रियेचा अवलंब करून भरणे बंधनकारक असणार आहे.
- मात्र सदर कर्मचाऱ्यांना यापूर्वी केलेल्या सेवेचे कोणतेही लाभ अथवा थकबाकी अनुज्ञेय नसणार आहे. (शासन निर्णय)
करार कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचा शासन निर्णय!
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भात, राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!