NHM Employees Salary GR : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यरत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना वाढीव मोबदला देण्याचा महत्वपूर्ण घेतला असून, याबाबतचा शासन निर्णय दिनांक ५ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या कर्मचाऱ्यांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडयात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण ५८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो.
तथापि, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरीता त्यांना दिनांक १७ जुलै, २०२०, ०९ सप्टेंबर, २०२१ व दि.१० एप्रिल, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी रु.५०००/- व ६२००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील वाढीव मोबदला यापूर्वी माहे एप्रिल २०२३ ते डिसेंबर २०२३ पर्यंतचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे.
आता आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात रू. ५०७७७.०२ लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले आहे. त्यानुषंगाने वित्त व नियोजन विभागाने पुढील ३ महिन्यांकरिता (माहे जानेवारी २०२४ ते मार्च २०२४) या कालावधीचे वाढीव मोबदला अदा करण्यासाठी रू. ९५१९.०० लक्ष इतका निधी वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. तसा याबाबतचा शासन निर्णय दिनांक ५ मार्च २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय)
गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची आता 'ही' मागणी मान्य होणार
कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती संदर्भात, राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!
आरटीई 25 टक्के प्रवेश महत्वाची अपडेट पहा