Women Day 2024 : जागतिक महिला दिनानिमित्त शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाचे शासन परिपत्रक काढण्यात आले आहे.
$ads={1}
शासकीय कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वाचे शासन परिपत्रक
जागतिक महिला दिनानिमित्त बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना, मुंबई यांच्यातर्फे बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांसाठी मंगळवार दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी आरोग्य भवन सभागृह, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, मुंबई येथे दुपारी २.०० वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यानुसार बृहन्मुंबईतील शासकीय कार्यालयांतील महिला कर्मचा-यांना वरील कार्यक्रमासाठी उपस्थित राहता यावे यासाठी त्यांना मंगळवार दिनांक १२ मार्च, २०२४ रोजी दुपारी १.३० वाजता कार्यालय सोडण्याची अनुमती देण्यात आली आहे.
सर्व मंत्रालयीन विभागांनी बृहन्मुंबईतील आपल्या आधिपत्याखालील कार्यालयांना त्याप्रमाणे कळविण्याची व्यवस्था करावी. तथापि या महिला कर्मचा-यांनी सवलत्तीमुळे कार्यालयीन कामकाजाच्या येळेत येणारी ४.४५ तासांची तूट पुढील आठवड्यात भरून काढावी. असे परिपत्रकात नमूद आहे.
गुड न्यूज! अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांची आता 'ही' मागणी मान्य होणार
मोठी बातमी ! 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या 'या' कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू