राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे, राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!

Government Employees Retirement Age : राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यासंदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेमध्येबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य शासनाला राहतील, असा निर्णय दिलेला आहे, त्यानुषंगाने सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.

$ads={1}

राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे, राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय!

Government Employees Retirement Age

राज्यातील कृषि विद्यापीठांमधील आणि संलग्नित व अनुदानित महाविद्यालयांमधील सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख, सहयोगी अधिष्ठाता, शारीरिक शिक्षण निदेशक, क्रिडा अधिकारी, ग्रंथपाल, अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६२ वर्षे वयावरुन ६० वर्षे करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने दिनांक २० फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयानव्ये घेतला आहे.

परिणामी, असे सर्व अध्यापकीय कर्मचारी ज्या महिन्यात ६० वर्षांचे होतील, त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी मध्यान्नोत्तर सेवेतून निवृत्त होतील आणि ज्या अध्यापकीय कर्मचा-यांची जन्मतारीख महिन्याच्या एक तारखेला असेल ते अध्यापकीय कर्मचारी ६० वर्षे वयाचे होताच मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी मध्यान्नोतर सेवानिवृत्त होतील.

मात्र कृषि व पदुम विभागाच्या दि.४.४.२०१५ च्या शासन निर्णयास अनुसरून ज्या अध्यापकीय कर्मचा-यांनी, सेवानिवृत्ती वयोमर्यादा ६० वर्षावरुन ६२ वर्ष केलेल्या निर्णयाचा लाभ घेतलेला आहे, असे ६० वर्षावरील अध्यापकीय कर्मचारी, वयाची ६२ वर्षे पूर्ण होताच सेवानिवृत्त होतील.

सदर शासन निर्णय मा. मंत्रिमंडळाच्या दि.०५.०२.२०२४ रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार व वित्त विभागाच्या अनौपचारीक दि.२५.०१.२०१९ अन्वये मिळालेल्या सहमती नुसार निर्गमित करण्यात आला आहे. (शासन निर्णय)

राज्यातील या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट!

मोठी बातमी ! 1 नोव्हेंबर 2005 नंतरच्या 'या' कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू

आरटीई 25 टक्के प्रवेश महत्वाची अपडेट पहा

Previous Post Next Post