आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा! | RTE Admission Documents List 2024 25

RTE Admission Documents List 2024 25 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 (RTE Act 2009) शिक्षण हक्क कायद्यानुसार महाराष्ट्र राज्यातील विशेषतः खाजगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी RTE अंतर्गत 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते.

यामध्ये नविन प्रवेशित मुलांसाठी 25 टक्के जागा या राखीव असतात. दरवर्षी पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून, आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत लॉटरी पद्धतीने 25 टक्के प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. पुढील शैक्षणिक वर्ष 2024-25 च्या प्रवेशासाठी लवकरच ऑनलाईन अर्ज करता येणार आहे, त्यापूर्वी RTE प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (RTE Admission Documents List) कोणती आहेत? व आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी वयोमर्यादा किती असणार आहे? या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

$ads={1}

आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी लागणारे 'ही' आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा!

RTE Admission Documents List 2024 25

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी आरटीई प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, सध्या RTE पोर्टल अद्ययावत करण्याचे तांत्रिक काम सुरु आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरु होताच सर्वप्रथम शाळांची नोंदणी आणि त्यानंतर पालकांना RTE पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.  

नवीन शैक्षणिक वर्षातील RTE प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण होण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असून, यंदा साधारणपणे मार्च/एप्रिल महिन्यामध्ये पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. तत्पूर्वी ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून, पुढील शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी कोणती कागदपत्रे (RTE Admission Documents List) आवश्यक आहे ते पाहूया..

मागील वर्षाचा अनुभव पाहता साधारणपणे RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेकरीता लागणारी आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतची ग्राह्य धरण्यात येते.  त्यानंतरची कागदपत्रे ही स्वीकारली जात नाही. त्यामुळे पालकांनी 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी लागणारी कागदपत्रे आताच काढून ठेवावीत. जेणेकरून ऐनवेळेवर धावपळ होणार नाही. RTE 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.

आरटीई प्रवेश 2022-23 महाराष्ट्राची कागदपत्रे (RTE Admission Documents List)

  1. आधार कार्ड
  2. रहिवाशी प्रमाणपत्र वास्तव्याचा पुरावा
  3. जन्माचा दाखला (जन्म दाखला)
  4. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखापेक्षा कमी उत्पन्न)
  5. जातीचा दाखला - वंचित जात सवर्गातील असल्यास वडिलांचे व बालकाचे जात प्रमाणपत्र
  6. दिव्यांग असल्यास - जिल्हा शल्यचिकित्सक यांचे किमान 40% चे दिव्यांग प्रमाणपत्र
  7. एकल पालकत्व असल्यास आई किंवा वडील यांचे (single parent) कागदपत्रे
  8. घटस्फोटित महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  9. न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  10. विधवा महिला असल्यास संबंधित कागदपत्रे
  11. HIV बाधित/प्रभावित असल्यास संबंधित कागदपत्रे
  12. अनाथ बालके असल्यास आवश्यक कागदपत्रे
मोठी बातमी! आरटीई २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी नवीन नियम (शैक्षणिक वर्ष 2023 24)

  • 'आरटीई' 25 टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्जामध्ये सादर केलेली कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते.
  • RTE 25% Online प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी Online प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची ग्राह्य धरण्यात येतात.
  • विद्यार्थ्याचे आधार कार्ड / नसेल तर पालकांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे मागील वर्षी अनिवार्य करण्यात आली आहे.
  • सदरचे आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून 90 दिवसांच्या आत शाळेकडे सादर करणे आवश्यक असते.
  • कोव्हीड प्रभावित बालकांच्या प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे - मृत्यु प्रमाणपत्र , कोव्हीड १९ मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, (Medical Certification of Cause of Death ( Form No. 4), (SeeRule7) सदर मृत्यू कोव्हीड १९ शी संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र
  • अनाथ बालकांसाठी अनाथालयाची / बालसुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरणार, बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र देणे आवश्यक आहे. (यादी डाउनलोड)

आरटीई २५%पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन वयोमर्यादा पहा

$ads={2}

आरटीई अंतर्गत प्रवेशाची नियमावली जाहीर

आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी पालकांना या तारखेनंतर करता येणार अर्ज
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा