गुड न्यूज! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वार्षिक मानधनवाढ पुन्हा लागू, वाढीव मानधनासह फरकाची रक्कम या महिन्यात मिळणार

Contract Employees Annual Pay Hike : मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली दि. २४ जुलै २०२३ रोजी संपन्न झालेल्या बैठकीत अभियानांतर्गत नियुक्त व सद्यस्थितीत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांपैकी दिनांक २५ सप्टेंबर २०२० ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीत ज्या कंत्राटी कर्मचा-यांची वार्षिक मानधनवाढ गोठविण्यात आलेली होती, त्या कंत्राटी कर्मचा-यांची गोठविण्यात आलेली वार्षिक मानधनवाढ देण्याबाबत निर्णय झाला आहे, त्यानुषंगाने सदरील गोठविण्यात आलेली ५ टक्के वार्षिक मानधनवाढ लागू करण्यात आली आहे.

$ads={1}

गुड न्यूज! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वार्षिक मानधनवाढ पुन्हा लागू

Contract Employees Annual Pay Hike

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचा-यांची वार्षिक मानधनवाढ गोठविण्यात आलेली होती. मात्र आता नियुक्त व सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या सर्व कंत्राटी कर्मचा-यांना गोठविण्यात आलेली ५ टक्के मानधनवाढ दिनांक १ एप्रिल २०२२ पासून पुन्हा लागू करण्यात आलेली आहे. याबाबतचे महत्वाचे परिपत्रक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी काढण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सद्यस्थितीत ३४ जिल्हे व ३५१ तालुक्यांमध्ये अभियानाची इंटेन्सिक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत आहे. 

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये व तालुक्यांमध्ये अनुक्रमे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष व तालुका अभियान अभियान व्यवस्थापन कक्ष निर्माण करण्यात आलेले असून, अभियानांतर्गत राज्यस्तरापासून ग्रामस्तरापर्यंत स्वत्रंत, समर्पित व संवेदनशील यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे.

तरी सद्यस्थितीत अभियानात कार्यरत असलेल्या ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अभियानांतर्गत दिनांक २५ सप्टेंबर २०२० ते दिनांक ३१ मार्च २०२२ या कालावधीत ११ महिन्याची दोनवेळा पुर्ननियुक्ती देण्यात आलेली आहे. त्या कंत्राटी कर्मचा-यांना एक मानधनवाढ वरील प्रमाणे १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात आलेली आहे.

वरील प्रमाणे सदर कालावधीत ११ महिन्याची दोन वेळा पुर्ननियुक्ती देण्यात आलेली आहे. अशा कर्मचा-यांना दिनांक २५/०९/२०२० नंतर ज्या तारखेस त्यांना ११ महिन्यासाठी प्रथम पुर्ननियुक्ती देण्यात आली त्या तारखेस देय असलेल्या एकूण मानधनावर ५ टक्के मानधनवाढ गृहीत धरुन ती रक्कम त्या कर्मचा-यास त्या करार कालावधीसाठी लागू करावी व येणारी फरकाची रक्कम संबंधित कर्मचा-यास अदा करण्यात येणार आहे.

तसेच सदर प्रथम करार नूतनीकरणाची ५% मानधनवाढ ही पहिल्या करारापासून आजपर्यंत देण्यात आलेली नाही. तरी सदर मानधनवाढ पहिल्या करारापासून माहे जानेवारी २०२४ पर्यंत कर्मचारीनिहाय Due Drawn Statement च्या आधारे देण्यात येणार असल्याचे परिपत्रकात म्हंटले आहे.

उदा. 'अ' कर्मचा-यास दरामहा रु २०५००/- मानधन देय आहे. त्या 'अ' कर्मचा-याचा १९ महिन्याचा करार दिनांक ५ डिसेंबर, २०२० रोजी संपला व त्या कर्मचा-यास एक दिवसाचा खंड देऊन दिनांक ७ डिसेंबर २०२० पासून दिनांक ६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीसाठी ११ महिन्यासाठी कंत्राटी पध्दतीने पुनर्नियुक्ती दिली असल्यास दिनांक ७ डिसेंबर २०२० रोजी देय असलेल्या रु २०५००/- या रक्कमेवर ५ टक्के मानधनवाढ लागू करणे, म्हणजेच रु. १०२५/- ही त्याची मासिक मानधनवाढ असून त्यास ११ महिन्याचे गुणाकार करुन १९,२७५/- एवढी रक्कम येईल, ती रक्कम त्या संबंधित कर्मचा-यास मानधनवाढीच्या फरकाची रक्कम म्हणून अदा करावी व पुढील आकारणी सुध्दा या आधारे करावी.) तसेच कर्मचारीनिहाय मानधनवाढ लक्षात घेता सुधारीत मानधन परिगणनेनुसार सुधारीत मानधन निश्चत करून संबंधीत कर्मचा-यांचे मासिक मानधन अदा करण्यात यावे.

वाढीव मानधनासह फरकाची रक्कम या महिन्यात मिळणार

याप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांच्या करारानुसार थकीत मानधनासह कर्मचाऱ्यांची गोठविण्यात आलेली ५ टक्के मानधन वाढीतील फरकाची रक्कम ही माहे फ़ेब्रुवारी, २०२४ चे मानधन अदा करताना (February २०२४ paid in March २०२४) अदा करण्यात यावी. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. (परिपत्रक येथे पहा)

आरटीई २५%पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन वयोमर्यादा पहा

करार पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय!

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्मचाऱ्यांना मिळणार सॅलरी अकाउंटचे हे लाभ; महत्वाचे परिपत्रक

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा