Employees Arrears GR : राज्यातील केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक यांच्या थकीत मानधन अदा करण्यासाठी शासनाने मान्यता दिली असून, समग्र शिक्षा योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता राज्य हिस्सा या लेखाशिर्ष सहायक अनुदाने या अंतर्गत सदरचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे, तसा शासन निर्णय दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ निर्गमित करण्यात आला आहे.
$ads={1}
राज्यातील या कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मंजूर, शासन निर्णय जारी
केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) योजनेंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक यांनी थकित मानधनाप्रकरणी मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर येथे अवमान याचिका व इतर संलग्न याचिका दाखल केल्या आहेत.
या याचिकेत मा.उच्च न्यायालयाच्या दि.१५.१२.२०२३ रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने विभागीय अध्यक्ष, एसएससी बोर्ड व शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे स्तरावर पात्र ठरलेल्या विशेष शिक्षकांचे वेतन अदा करण्यासाठी व अपात्र ठरलेल्या शिक्षकांना त्यांच्या सेवा समाप्तीच्या आदेशापर्यंत वेतन अदा करण्याची विनंती शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी केली होती.
त्यानुसार समग्र शिक्षा योजनेंतर्गत सन २०२३-२४ करीता राज्य हिस्सा लेखाशिर्ष (२२०२ आय ६१२) ३१ सहायक अनुदाने या अंतर्गत सदरचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे.
सदर निधीतून अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक यांच्या थकित मानधनाकरीता एकूण रु.२,१०,७८,१७१/- (अक्षरी रु. दोन कोटी दहा लक्ष अठ्याहत्तर हजार एकशे एकाहत्तर फक्त) इतका निधी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक परिषद, मुंबई यांना वितरीत करण्यास दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
वित्त विभाग, शासन निर्णय/परिपत्रक दि.१२.०४.२०२३ मध्ये नमूद केलेल्या सर्व अटींची पूर्तता होत आहे. सदरचे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरीताच्या अटी व शर्ती या शासन निर्णयात नमूद केल्या आहेत. (शासन निर्णय)
गुड न्यूज! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वार्षिक मानधनवाढ पुन्हा लागू
गुड न्यूज! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय!
$ads={2}
आरटीई २५%पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन वयोमर्यादा पहा
राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्मचाऱ्यांना मिळणार सॅलरी अकाउंटचे हे लाभ; महत्वाचे परिपत्रक