Salary Account : राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्मचाऱ्यांना मिळणार सॅलरी अकाउंटचे हे लाभ; महत्वाचे परिपत्रक

Employees Salary Account : राष्ट्रीयकृत बँकेमार्फत शासन सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित बँक Salary Account धारकांना बचत खात्यामध्ये मिळत असलेल्या लाभाव्यतिरीक्त इतर विविध लाभ देण्यात येतात, आता यांसदर्भात महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना याचा लाभ घेण्याकरिता महत्वाचे परिपत्रक काढण्यात आले आहे, सविस्तर वाचा..

$ads={1}

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्मचाऱ्यांना मिळणार सॅलरी अकाउंटचे हे लाभ

Employees Salary Account

महावितरण कंपनीमध्ये कार्यरत असलेले सर्व अधिकारी व कर्मचारी यांना त्यांचे मासिक वेतन व इतर देयके त्यांनी महावितरण कंपनीस सादर केलेल्या बैंक खातेच्या माहितीनुसार त्यांच्या बैंक खात्यामध्ये थेट जमा करण्यात येते.

तथापि, महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांचे मासिक वेतन व इतर देयके जमा करण्यात येत असलेले बैंक खाते Salary Account नसल्यामुळे राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड बैंकेकडून देण्यात येणारे विशेष लाभ महावितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी यांना मिळत नाहीत.

कर्मचाऱ्यांना मिळणार सॅलरी अकाउंटचे हे फायदे

राष्ट्रीयकृत बँकेमार्फत शासन सेवेत असणाऱ्या Salary Account धारकांना बँकेकडून बचत खात्यामध्ये मिळत असलेल्या लाभाव्यतिरीक्त इतर विविध लाभ जसे की, Zero Balance Facility, Personal Accident Cover, Total Permanent Disability Benefit, Partial Disability cover, Air Accident Insurance, Mediclaim Top up तसेच इतर विविध लाभ देण्यात येतात.

आता मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मुंबई यांनी संबंधित मुख्य अभियंता, म.रा.वि. वितरण कंपनी मर्यादित विभाग अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड बँकेतील बचत खाते Salary Account मध्ये रूपातंरीत करून घेण्याबाबत अवगत करण्यासंदर्भात परिपत्रक काढले आहे, जेणेकरून सर्व अधिकारी व कर्मचारी यांना Salary Account करीता राष्ट्रीयकृत व शेड्युल्ड बँकेमार्फत देण्यात येणारे विविध लाभ मिळू शकतील. असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

आरटीई २५%पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन वयोमर्यादा पहा

गुड न्यूज! राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वार्षिक मानधनवाढ पुन्हा लागू

अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज!

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा