राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या अस्थायी पदांना मुदतवाढ; शासन निर्णय निर्गमित

National Health Mission Temporary Posts Extension : सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना वित्त विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, त्यानुषंगाने आता राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबतचा महत्वपूर्ण शासन निर्णय दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.

$ads={1}

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या अस्थायी पदांना मुदतवाढ; शासन निर्णय निर्गमित

National Health Mission Temporary Posts Extension

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कार्यक्रम राबविण्यासाठी राज्य आरोग्य अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यातील जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 

केंद्र शासनाने दिनांक २ मार्च, २०१७ रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ज्या केंद्र पुरस्कृत योजना सन २०१६-१७ या वर्षात राबविण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व केंद्र पुरस्कृत योजना सन २०१७-१८ मध्ये सुरु ठेवण्याबाबत कळविलेले आहे. 

त्यास अनुसरुन दिनांक १ एप्रिल, २०१७ पासून जोपर्यंत केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे, तो पर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासनामार्फत राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासन पुरस्कृत सर्व योजनांना मुदतवाढ देण्यात आली आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य स्तरावरील निर्माण केलेल्या अतिरिक्त अभियान संचालक, सह संचालक, सहायक संचालक या अस्थायी पदांना आता मुदतवाढ देण्यात आली आहे. सदर पदांची यापुढेही आवश्यकता लागणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

वित्त विभागाच्या दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना दिनांक १ मार्च, २०२४ ते दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

त्यानुषंगाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत संचालक, राज्य आरोग्य अभियान यांच्या स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या अस्थायी पदांना दिनांक १ मार्च, २०२४ ते दिनांक ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. (शासन निर्णय)

अंगणवाडी कर्मचारी संदर्भात सरकारचा महत्वपूर्ण निर्णय वाचा

आरटीई २५%पहिलीत प्रवेश घेण्याची वयोमर्यादा बदलली; नवीन वयोमर्यादा पहा

$ads={2}

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा