NHM Ahmednagar Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती सुरु झाली असून, दि २० मार्च २०१४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत, सविस्तर तपशील जाणून घ्या.
$ads={1}
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती सुरु, सविस्तर तपशील पहा
जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोयायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावरील विविध कार्यक्रम अंतर्गत विविध कंत्राटी पदांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता
वयोमर्यादा : अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराचे किमान वय खुल्या प्रवर्गासाठी १८ वर्ष व कमाल वय खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्ष राहील.
अर्ज करावयाच्या सुचना
- उमेदवारांनी जाहिरातीतील नमूद अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
- अर्जात विलेल्या प्रत्येक मुद्यांची माहिती अचुक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अर्जासोबत जोडलेल्या शैक्षणिक अर्हतेच्या छायांकित प्रती तसेच ज्या प्रवर्गात अर्ज सादर केला आहे त्या प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र व धनाकर्ष व्यतिरिक्त इतर कागदपत्र जोडु नयेत.
- एका पदाकरीता एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. एका पेक्षा अधिक पदांकरीता स्वतंत्र अर्ज भरणे आवश्यक असुन प्रत्येक पदांकरीता अर्ज शुल्कवांचा स्वतंत्र धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे.
- राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कार्यरत असल्यास ५ वर्ष वयाची अट शिथिल राहील.
आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु, लेटेस्ट अपडेट पहा
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत नवीन भरती, सविस्तर तपशील पहामहत्वाचे : कंत्राटी सेवेकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाचे संख्येनुसार अर्जाची छाननी करुन पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार आवश्यक्ते प्रमाणे एका जागेसाठी तीन/पाच या पद्धतीचा अवलंब करुन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व इतर माहिती http://nagarzp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. उमेदवारांशी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार करण्यात येणार नाही.