Contract Electricity Employees : महावितरण,महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिनांक 5 मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले होते, मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक ९ मार्च २०२४ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संयुक्त कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक संपन्न झाली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण झाल्यामुळे आणि मिळालेल्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आला आहे, सविस्तर वाचा..
$ads={1}
कंत्राटी या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न
महावितरण, महापारेषण व महानिर्मिती मध्ये मागील १० ते १५ वर्षांपासून हजारो कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. किमान वेतन मिळावे, तसेच सदरचे वेतन वेळेवर मिळावे, रिक्त पदांवर लवकरात लवकर भरती करण्यात यावी या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचारी ५ मार्चपासून बेमुदत उपोषण आंदोलनाला सुरुवात करणार होते. या आंदोलनाच्या पावित्र्यात असणाऱ्या या कर्मचाऱ्यांशी सरकारने चर्चा करून त्यांना न्याय द्यावा, असे यावेळी मा. विधानपरिषद सदस्य सतेज पाटील यांनी सरकारचे लक्ष वेधले होते.
या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने दिनांक ९ मार्च २०२४ रोजी नागपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक पार पडली आहे.
या बैठकीत जवळपास १७ महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली, त्यानंतर माध्यमाशी बोलताना कंत्राटी कामगारांबद्दल सरकारचा दृष्टिकोन हा नेहमी कायम सकारात्मकच आहे आणि राहील, त्यांचे काही प्रश्न महत्वाचे असून, त्यामध्ये वेतनवाढ, अपघात विमा, मेडिक्लेम, किमान वेतन वेळेवर मिळावे, यासंदर्भात आम्ही सकारात्मक असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
कंत्रादार कंत्राटी कामगारांची फसवणूक करतात, त्यावर उपाययाेजना काढा अशी त्यांची महत्वाची मागणी आहे. त्यावर कामगारांच्या खात्यात थेट सरळ पैसे जमा करण्यासाठीचा आमचा प्रयत्न राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
यासंदर्भात तिन्ही वीज कंपनी आणि सयुंक्त कृती समिती यांच्यात बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.