Contract Electricity Workers Accident Insurance : महाराष्ट्र राज्य कंत्राटी वीज कामगार संघ यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत पाठपुरावा करून मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अपघात विमा लागू करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुसार महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीन कंपन्यांमध्ये कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. आता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना चार लाखांचा अपघात विमा लागू करण्याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.
$ads={1}
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना चार लाखांचा अपघात विमा; कंपनीच्या तीनही विभागांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार
वीज कंपनीची सेवा बजावत असताना दुर्दैवाने अपघात झाल्यास या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता विमा संरक्षण मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना चार लाखांचा अपघात विमा लागू करण्यात आला असून, त्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यापूर्वी या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे अपघाताबाबतचे संरक्षण दिले जात नव्हते.
त्यानुसार आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. वीस कंपन्यांमध्ये कुशल आणि अकुशल म्हणून अनेक विभागांमध्ये कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना आता अपघात विम्याचा लाभ मिळणार आहे. या अपघात विम्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संरक्षण मिळणार आहे.
कर्मचाऱ्यांना 10 हजारांपासून 4 लाखांपर्यंत अपघात विमा
महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या तीनही विद्युत कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता 10 हजारापासून 4 लाखांपर्यंत अपघात विमा दिला जाणार आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळावे अशी या कर्मचाऱ्यांची अनेक दिवसांपासून मागणी होती. ही मागणी या सरकारने पूर्ण केल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
राज्यातील या कंत्राटी पदांच्या मानधनात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ; शासन निर्णय जारी
कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांना चार लाखांचा अपघात विमा@Dev_Fadnavis #Nashik #contract_workers #accident #insurance #safty @MAHAVITARAN @MSEDCL @WeAreNashik @MahaDGIPR pic.twitter.com/exz0tJMcy0
— DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@InfoNashik) January 29, 2024
जुनी पेन्शन योजना लेटेस्ट शासन निर्णय