Arogya Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य संस्थामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर एस- २०) या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये तब्बल १७२९ पदांसाठी भरती करण्यात येत आहे.
$ads={1}
आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करा | Arogya Vibhag Bharti 2024
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय अधिकारी गट-अ (सातवा वेतन आयोग वेतनस्तर एस २० वेतनश्रेणी रु. ५६१००-१७७५००) संवर्गातील १७२९ रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली असून, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
पदांचा तपशील
- पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (गट-अ)
- वेतनश्रेणी : एस २० - रु. ५६१००-१७७५०० (सातवा वेतन आयोग वेतनस्तर एस २०)
- एम.बी.बी.एस. (MBBS) व पदव्युत्तर पदवी/ पदविका (एकूण-१४४६ पदे)
- बी.ए.एम.एस. (BAMS) व पदव्युत्तर पदवी/ पदविका (एकूण २८३ पदे)
- एकूण पदे : १७२९
एकूण १७२९ पदांपैकी ६९ पदे दिव्यांग व्यक्तीसाठी राखीव येत असून ही पदे अस्थिव्यंग (एका पायाने दिव्यांग) संवर्गासाठी पदे आरक्षित ठेवण्यात आली आहेत.
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज भरण्यास सुरुवात होण्याची तारीख: 01-02-2024
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख: 18-02-2024
महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट- 'अ' या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी (एस-२०) या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात/ अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यानुसार उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्ण पणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत.
उपरोक्त नमूद पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेतनश्रेणी, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, सूचना, निवडीचे निकष इत्यादी तपशिलासाठी सदर संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज कसा करावा?
- उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्ण पणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत. (मुळ जाहिरात पहा)
अधिक माहितीसाठी: http://arogya.maharashtra.gov.in
राज्यातील या कंत्राटी पदांच्या मानधनात तब्बल 8 हजार रुपयांची वाढ; शासन निर्णय जारी
$ads={2}