Cidco Recruitment 2024 : 'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु

Cidco Recruitment 2024 : नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था 'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे, यामध्ये तब्बल १०१ पदांची भरती सुरु असून, याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

$ads={1}

'सिडको' महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी! या पदासाठी मोठी भरती सुरु

Cidco Recruitment 2024

'सिडको' या भारतातील ख्यातनाम नगर नियोजन संस्थेने महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई व विविध नवीन शहरांचे शिल्पकार अशी जागतिक पातळीवर ओळख निर्माण केली आहे. दर्जेदार गृहनिर्माण सुविधा, नाविन्यपूर्ण पायाभूत सुविधा, परिवहन सेवा, स्मार्ट सिटी, आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, नैना आदी वैविध्यपूर्ण नागरी विकास प्रकल्पांच्या माध्यमातून नगर नियोजनाची व विकासाची अनुभूती येत आहे.

सिडको तर्फे वर्ग-२ मधील रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील पुढीलप्रमाणे

  • एकूण रिक्त पदांची संख्या : १०१
  • पदाचे नाव : सहाय्यक अभियंता (स्थापत्य) (Assistant Engineer (Civil)
  • वेतनश्रेणी : एस-१५, (रु. ४१,८००-१,३२,३००/-)

महत्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी : दिनांक १९ जानेवारी २०२४ ते दिनांक २० फेब्रुवारी २०२४ पर्यंत.

(कर्मचारी अपडेट्स येथे पहा - कंत्राटी कर्मचारी)

विस्तृत जाहिरात, पात्रता, निकष, आणि अटी व शर्ती, अर्जाचा विहित नमुना इत्यादी माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा "Career" या सेक्शन अंतर्गत उपलब्ध आहे.

आरोग्य विभागामध्ये 1729 पदांची मेगा भरती, ऑनलाईन अर्ज करा

मूळ जाहिरात PDF येथे पहा
ऑनलाईन अर्ज : https://ibpsonline.ibps.in/cidcoapr23/
अधिक माहितीसाठी : www.cidco.maharashtra.gov.in

Previous Post Next Post