Anganwadi News : अंगणवाडी कर्मचारी व कृति समितीच्या पदाधिकाऱ्यांची मा. सचिव, महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य, महिला व बाल विकास आयुक्त व अन्य आधिकाऱ्यांसोबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न झाली.
$ads={1}
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन, संप मागे घेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आनंद
शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे मान्य केले असून, लवकरात लवकर प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजुरीसाठी पाठवला जाईल, असे सांगितले. तसेच कृति समितीच्यावतीने पेन्शन योजनेबाबत ठोस सुधारणांचा लेखी प्रस्ताव देण्यात आला.
- अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव लवकरात लवकर मंत्रीमंडळ मंजुरीसाठी पाठवण्यात येणार
- मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅच्युईटी देण्याचे मान्य केले आहे.
- अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका / मुख्यसेविका, तांत्रिक मनुष्यबळ यांना स्मार्ट मोबाईल फ़ोन तात्काळ देणार.
- मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण अंगणवाडी सेविका पदाचे आदेश त्वरित देणार.
- संपकाळात कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे मान्य केले आहे. तसेच सर्व कारवाई आदेश मागे घेणार.
- कोरोनाकाळात तसेच उन्हाळी व दिवाळी सुटीमध्ये केलेले काम संपकाळात समायोजित करावे, त्याद्वारे संपकाळातील मानधन अंगणवाडी सेविकांना मिळेल, यावर सकारात्मक विचार
- दहावी (10) वी पास मदतनिसांना सेविका पदी थेट नियुक्ती देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत आप्पा पाटील, सुवर्णा तळेकर यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी एम. ए. पाटील, शुभा शमीम, दत्ता देशमुख, दिलीप उटणे, माधुरी क्षीरसागर, निशा शिवरकर उपस्थित होते.