राज्यातील 1 हजार 523 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सरकारचा निर्णय! या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संदर्भात शासन निर्णय निर्गमित

Contract Employees GR : राज्यातील जिल्हा परिषदांच्या अंतर्गत कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्रातील मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित केला आहे.

$ads={1}

राज्यातील 1 हजार 523 प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सरकारचा निर्णय

Contract Employees Gr

रायगड, कोल्हापूर, नाशिक, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांच्या विनंतीनुसार स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येणार आहे. उर्वरित २९ जिल्हा परिषदांकरीता पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

सहसंचालक, आरोग्य सेवा, (प्रा.आ.के/उपकेंद्र/दवाखाने), मुंबई यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे राज्यभरातील एकूण २९ जिल्हयांमधील (५ जिल्हे वगळून) १५२३ कार्यरत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रती प्राथमिक आरोग्य केंद्र जास्तीत जास्त ३ सुरक्षा रक्षकांच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग) कंत्राटी पद्धतीने ३ वर्षाकरीता घेण्याकरीता मान्यता देण्यात आली आहे.

राज्यभरातील २९ जिल्ह्यांमधील ( वरील ५ जिल्हे वगळून) प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने बाहययंत्रणेद्वारे (आऊटसोर्सिंग) सुरक्षा रक्षक सेवा घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

त्यानुसार सुरक्षा रक्षकांचे प्रतिमाह ठोक रक्कम (वेतन) रु.१६,०००/- प्रमाणे रु.७.३१ कोटी प्रतिमाह म्हणजेच वार्षिक रु.८७.७२ कोटी अंदाजित खर्चास शासन निर्णयातील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. (शासन निर्णय)

राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होणार - Budget Meeting 2024
Previous Post Next Post