Talathi Bharti Selection List 2024 : मोठी अपडेट! तलाठी भरती (Result) निवड यादी जाहीर

Talathi Bharti Selection List 2024 : महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती (सन २०२३) निवड यादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात आले आहे, याबाबतचे प्रसिध्दीपत्रक महाभूमिकडून जाहीर करण्यात आले आहे.

$ads={1}

मोठी अपडेट! तलाठी भरती (Result) निवड यादी जाहीर

Talathi Bharti Selection List 2024

महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील तलाठी (गट-क) संवर्गाचे सरळसेवा पदभरती २०२३ मधील गुणवत्ता यादी प्रसिध्दी करणेत आली आहे. भरतीचा पुढील टप्पा हा निवडयादया व प्रतिक्षायादया तयार करणेचा आहे, सोबत पेसा क्षेत्र नसलेल्या २३ जिल्हयातील तलाठी पदासाठी शिफारस केलेल्या उमेदवारांच्या निवडयादया व प्रतिक्षा यादया प्रसिध्द करणेत आल्या आहेत. 

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णनुसार प्रत्येक जिल्हयात नियुक्त करावयाच्या उमेदवारांची निवडयादी तसेच प्रतिक्षा यादी ही संबंधित जिल्हयाच्या जिल्हा निवड समितीने तयार केलेली आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू) १७ संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने दाखल याचिका मधील निर्णयास अधिन राहून अनुसूचित क्षेत्र (पेसा कायदा लागू) असलेल्या १३ जिल्हयांची निवडयादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्हयांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाचे पुढील निर्देशानंतर करणेत येईल, त्यामुळे निवडयादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येणाऱ्या जिल्हयांची नावे खालील प्रमाणे आहे. 

रायगड, कोल्हापुर, अकोला, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, बुलढाणा, बीड, लातूर, गोंदिया, नागपुर, धाराशिव, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सोलापूर, वाशिम, परभणी, जालना, वर्धा, छ. संभाजी नगर, भंडारा, हिंगोली

उपरोक्त जिल्ह्यातील तलाठी भरती निकाल निवड यादी येथे डाउनलोड करा

निवडयादी व प्रतिक्षा यादी प्रसिध्दीनंतर उमेदवाराची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्ती पूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीकडून जिल्हास्तरावर करणेत येईल, जिल्हास्तरावरील कार्यवाही बाबतचे वेळापत्रक हे संबंधित जिल्हयांच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा परिषद भरती निकाल PDF येथे डाउनलोड करा

$ads={2}

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post