राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत या पदांसाठी मोठी भरती; सविस्तर तपशील पहा | National Urban Health Mission Recruitment 2024

National Urban Health Mission Recruitment 2024 : नवी मुंबई महानगरपालिका एकात्मिक आरोग्य कुटूंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत 15 व्या वित्त आयोगांतर्गत शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे, यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स (स्त्री व पुरुष), ए.एन.एम. औषधनिर्माता व इपिडेमोलॉजिस्ट पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

$ads={1}

राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत या पदांसाठी भरती

National Urban Health Mission Recruitment 2024

वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता थेट मुलाखत (Walk in interview) दि. 01/02/2024 रोजी घेण्यात येणार असून, स्टाफ नर्स पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

  • वैद्यकीय अधिकारी - 55
  • स्टाफ नर्स ( स्त्री ) - 49
  • स्टाफ नर्स ( पुरुष ) - 06
  • एकुण जागा - 110

वयोमर्यादा :- अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेच 1 फेब्रुवारी 2024 रोजी कमाल वयोमर्यादा पुढीलप्रमाणे

  • अराखीव प्रवर्गासाठी 38 वर्ष
  • राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष

आवश्यक कागदपत्रे

आवश्यक असलेल्या मुळ कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित केलेल्या प्रति अर्जाच्या नमुन्यात जोडाव्यात.

  1. वयाचा पुरावा (10 वी गुणपत्रक)
  2. शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  3. कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable)
  4. शासकीय, निमशासकीय व खाजगी संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र
  5. राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
  6. अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  7. आधारकार्ड
  8. पॅनकार्ड
  9. सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  10. अर्जदार विवाहीत असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र (Gazette)
  11. लहान कुटूंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
  12. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमी पत्र

अर्ज सादर करावयाचा पत्ता :- वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं. 1, से. 15 ए, किल्ले गावठाण जवळ, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-400614

महत्वाच्या तारखा :  अर्ज दि. 18/01/2024 ते दि. 01/02/2024 पर्यंत कार्यालयीलन कामकाजाच्या दिवशी (शनिवार, रविवार व. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) कार्यालयीन वेळेत सकाळी 9.45 ते सायंकाळी 6.15 या वेळेत सादर करावा. दि. 01/02/2024 नंतर प्राप्त अर्ज ग्राहय धरले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत भरती

राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) अंतर्गत रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया सुरु झाली असून, यामध्ये वैद्यकीय अधिकारी या पदाकरीता थेट मुलाखत (Walk in interview) दि.31/01/2024 रोजी घेण्यात येणार आहे व स्टाफ नर्स (स्त्री), स्टाफ नर्स (पुरुष), ए.एन.एम. औषधनिर्माता व इपिडेमोलॉजिस्ट, पदाकरीता इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज आरोग्य विभाग, 3 रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट नं.1, से. 15 ओ, किल्लेगावठाण जवळ, सी.बी.डी बेलापूर, नवी मुंबई 400614 येथे दि. 17/01/2024 ते 31/01/2024 पर्यंत सादर करावे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन वाढणार, बजेट संदर्भात महत्वाची मिटिंग संपन्न

$ads={2}

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाअंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

तलाठी भरती निवड यादी जिल्हानिहाय येथे पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा