Health Department Budget Meeting 2024 : वार्षिक कार्यक्रम सन 2024-25 आखणीच्या अनुषंगाने आरोग्य विभागाची बैठक उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब यांच्या मंत्रालयीन दालनात आयोजित करण्यात आली होती. यावेळी आरोग्य मंत्री डॉ. सावंत बोलत होते. बैठकीस उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री मा.श्री.अजितदादा पवार साहेब, प्रधान सचिव (नियोजन) सौरभ विजय, सचिव नवीन सोना, सचिव (वित्तीय सुधारणा) शैला ए., सचिव (वित्त) ओमप्रकाश गुप्ता, आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार आदी उपस्थित होते.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ होणार, वार्षिक कार्यक्रम सन 2024-25 आरोग्य विभागाची बैठक संपन्न
कर्करोगाच्या जलद निदानासाठी प्रत्येक जिल्ह्यात आता ‘कॅन्सर व्हॅन’ची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच आशा कार्यकर्ता व गट प्रवर्तक यांच्या मानधन वाढीसाठी निधीची मागणी सदर बैठकीत करण्यात आली.
आशा कार्यकर्ता व गट प्रवर्तक यांच्या मानधनात वाढ होणार
आशा कार्यकर्ता व गट प्रवर्तक यांचे कामाचे तास, जबाबदारी यांची वास्तविकता ओळखून मानधन वाढीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करीत आरोग्य मंत्री डॉ. सावंत म्हणाले, आशा कार्यकर्ता यांना 8 हजार रूपये व गट प्रवर्तक यांना 14 हजार रूपये मासिक मानधन देण्यात येत आहे.
मात्र वास्तविक बाबी तपासून आशा कार्यकर्ता यांच्या असलेले काम, जबाबदाऱ्या यांचा विचार व्हावा. त्यानुसार निधीची तरतूद उपलब्ध करून द्यावी.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘कॅन्सर व्हॅनची सुविधा मिळणार
जागतिक आरोग्य संघटनेनुसार देशात मोठ्या प्रमाणावर कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. तसेच राज्यातही यामध्ये वृद्धी होताना दिसत आहे. कर्करोगाचे रूग्ण वाढण्यामागे निदान न होणे हे मोठे कारण आहे. कर्करोगाचे निदान जलद होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘कॅन्सर व्हॅन’ची सुविधा करून देण्यात येणार आहे. त्यासाठी सन 2024-25 मध्ये निधीची आवश्यकता असून तरतूद उपलब्ध करून देण्याची मागणी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली आहे.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजन होणार, महत्वाचे निर्देश पहा
केमोथेरपीकरीता डे केअर सेंटर सुरू होणार
केमोथेरपी उपचार सर्व जिल्हा रूग्णालयांमध्ये सुरू करणे आवश्यक आहे. टाटा कर्करोग रूग्णालयसोबत सामजंस्य करार करून प्रत्येक जिल्हा रूग्णालयात केमोथेरपीकरीता डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे, असेही यावेळी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
यासोबतच मोफत उपचारामुळे वाढलेल्या रूग्णसंख्येसाठी औषध पुरवठा, प्रत्येक तालुक्यात डायलॅसीस सेंटर सुरू करणे, 102 रूग्णवाहिका सेवा, 108 रूग्णवाहिका सेवा, हिमोफिलीया उपचार केंद्र, फिरता दवाखाना, प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल एक्स- रे व्हॅन, सीबीनॅट मशीन खरेदी, कुष्ठरूग्णाला पोषण आहार, जिल्हा तसेच राज्य स्तरावर अद्ययावत साथरोग नियंत्रण केंद्राची निर्मिती, हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीमची उभारणी आदींसाठी निधी तरतूदीची मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न
आरोग्य विभागाकडील रूग्णालयांचे व्यवस्थापन, दुरूस्ती, नुतनीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र रूग्णालयांचे व्यवस्थापन करताना अडचणी येतात. परिणामी, नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. विभागाने बांधकाम सुरू असलेल्या रूग्णालयांचे बांधकामाच्या पुर्णतेनुसार वर्गवारी केली असून विशिष्ट कार्यपद्धती (एसओपी) तयार केली आहे.
सचिव श्री. सोना व आयुक्त धीरज कुमार यांनी बैठकीत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या बैठकीला आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संदर्भात शासन निर्णय निर्गमित