NHM Employees : खुशखबर! राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या कर्मचाऱ्यांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी

NHM Employees Salary : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन २०२३-२४ च्या राज्यशासनाच्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून कर्मचाऱ्यांना माहे ऑक्टोंबर २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील मोबदला रु.१२६९४.०० लक्ष इतकी रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

$ads={1}

खुशखबर! राष्ट्रीय आरोग्य अभियानातील या कर्मचाऱ्यांचा वाढीव मोबदला मंजूर, शासन निर्णय जारी

nhm employees salary

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, निकष व दराप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखडयात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात नेमून दिलेल्या एकूण ५८ सेवा केल्यास त्या सेवेस केंद्र शासनाने निर्धारित केल्याप्रमाणे प्रोत्साहनात्मक मोबदला दिला जातो.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रम व इतर राष्ट्रीय आरोग्य विषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक हया दोन्ही घटकांच्या भूमिका महत्वाच्या असल्यामुळे सदर कामांकरीता त्यांना दिनांक १७ जुलै, २०२०, ०९ सप्टेंबर, २०२१ व दि.१० एप्रिल, २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये प्रत्येकी रु.५०००/- व ६२००/- इतका वाढीव मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

तसेच सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात रु. ३००००.०० लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले असून एप्रिल २०२३ ते सप्टेंबर, २०२३ या महिन्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 'या' रिक्त पदांसाठी भरती सुरु

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात रू. ५०७७७.०२ लक्ष इतके अनुदान राज्य शासनाकडून मंजूर झाले आहे. त्यानुषंगाने वित्त व नियोजन विभागाने पुढील ३ महिन्यांकरिता (माहे ऑक्टोंबर २०२३ ते डिसेंबर २०२३) या कालावधीचे आशा स्वयंसेविका व गटप्रर्वतक यांचे मोबदला अदा करण्यासाठी रू. १२६९४.०० लक्ष इतका निधी वितरीत करण्यास मान्यता दिलेली आहे. (शासन निर्णय)

कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत - विधानसभा अतारांकित प्रश्न

$ads={2}

कंत्राटी कर्मचारी नियमित होणार, 90 टक्के मागण्या मान्य!
राज्यातील तासिका निदेशकांसाठी सरकारचा निर्णय

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा